इमारतीच्या ११व्या मजल्यावर आग : फ्लॅट जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 20:04 IST2018-08-01T20:03:13+5:302018-08-01T20:04:51+5:30

शहरातील वानवडी भागातील इमारतीमधल्या ११ मजल्यावर लागलेल्या आगीत फ्लॅट जळून खाक झाला आहे.

Fireat Kondhva on the 11th floor of the building | इमारतीच्या ११व्या मजल्यावर आग : फ्लॅट जळून खाक 

इमारतीच्या ११व्या मजल्यावर आग : फ्लॅट जळून खाक 

 

पुणे :शहरातील वानवडी भागातील इमारतीमधल्या ११ मजल्यावर लागलेल्या आगीत फ्लॅट जळून  खाक झाला आहे. शहरातील वानवडी भागात असलेल्या रुबी हॉल क्लिनिक असलेल्या साळुंके विहारजवळ ही घटना घडली. या भागातील  मॅस्ट्रो इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून धूर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी दोन वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाला फोन करण्यात आला. त्यानंतर अग्निशनम दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाने मिळून आग विझवली. या आगीत फरीदा वच्छा यांच्या फ्लॅटचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आग वेळीच नियंत्रणात आणण्यास यश आल्याने इतर फ्लॅटना कोणताही धोका पोचलेला नाही. 

     दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे. फ्लॅट कालपासून बंद असल्याने बाकी कोणतीही हालचाली नसल्याचे समजते.फायर ऑफिसर प्रमोद सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली. 

Web Title: Fireat Kondhva on the 11th floor of the building