शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

शुक्रवार पेठेतील वाडिया हॉस्पिटलच्या नवीन इमारतीला आग; लाकडी फर्निचर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 3:14 PM

शुक्रवार पेठेतील वाडिया हॉस्पिटल येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारतीच्या टेरेसवर सोमवारी दुपारी आग लागून त्यात तेथील गोडाऊनमधील लाकडी फर्निचर जळून खाक झाले़

ठळक मुद्देगोडावूनमध्ये लाकडी साहित्य असल्याने त्यांनी पटकन पेट घेतला, काही मिनिटातच गोडावून पेटले़ इमारतीत कोणीही नसल्याने आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती समजू शकली नाही़

पुणे : शुक्रवार पेठेतील वाडिया हॉस्पिटल येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारतीच्या टेरेसवर सोमवारी दुपारी आग लागून त्यात तेथील गोडाऊनमधील लाकडी फर्निचर जळून खाक झाले़ या इमारतीचे काम अजून सुरु असल्याने त्यात कोणीही नव्हते़ शुक्रवार पेठेतील वाडिया हॉस्पिटलच्या आवारात दुमजली इमारत बांधण्यात आली आहे़ या इमारतीचे काम सुरु होते़ त्यासाठी लागणारे प्लायवुड, खुर्च्या, वॉलपेपर अशा विविध वस्तू टेरेसवर पत्र्याचे गोडाऊन बनवून त्यात ठेवल्या होत्या़ सोमवारी दुपारी या गोडावूनला आग लागली़ अग्निशामक दलाला याची खबर दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी मिळाली़ तातडीने २ बंब व ३ टँकर घटनास्थळी रवाना झाले़ गोडावूनमध्ये लाकडी साहित्य असल्याने त्यांनी पटकन पेट घेतला आणि काही मिनिटातच संपूर्ण गोडावून पेटले़ या आगीच्या ज्वाळा इतके उंच जात होत्या की शेजारील झाडाच्या फांद्यांनीही पेट घेतला होता़ 

अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख समीर शेख यांनी सांगितले, की ही इमारत मोकळी होती़ टेरेसवर आग लागली असल्याने आम्ही बाहेरुन जाऊन पाण्याचा मारा केला़ १ वाजून ५६ मिनिटांनी आग पूर्णपणे विझविण्यात आली़ या आगीत गोडावूनमध्ये ठेवलेला सर्व माल जळून खाक झाला़ त्या इमारतीत कोणीही नसल्याने आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकली नाही़ 

 

टॅग्स :fireआगPuneपुणे