टाटा डीएलटी कंपनीच्या कंटेनर यार्डला आग; वीस पेक्षा जास्त कंटेनर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 14:48 IST2021-04-18T14:47:04+5:302021-04-18T14:48:04+5:30
रविवार आणि विकेंड लॉकडाऊनमुळे जीवित हानी टळली

टाटा डीएलटी कंपनीच्या कंटेनर यार्डला आग; वीस पेक्षा जास्त कंटेनर जळून खाक
वाकी बुद्रुक:- चाकण औद्योगिक वसाहतीमधील संतोष नगर येथील डीएलटी कंपनीच्या कंन्टेनर गाडी यार्डला लागली आग लागली होती. माळरानाला लागलेल्या वनव्यामुळे गाड्यांच्या यार्डला सदरची आग लागली. त्यामध्ये जवळ जवळ २० गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
आगीसह धुराचे लोट वाढल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. परंतु अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर आग आटोक्यात आणण्यात आली.
पुणे जिल्ह्याबरोबरच शहरातही आगीचे सत्र सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यापासून अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट जिल्ह्यावर आले असताना आगीच्या घटनेतून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मध्यंतरी शहरात गॅस लाईनच्या लिकेजमुळे कात्रज भागातही आग लागली होती. त्यानंतर शहरातील कॅम्प भागातही फॅशन स्ट्रीट येथे लागलेल्या आगीच्या घटनेत ४०० हून अधिक दुकाने जाळून खाक झाली होती. आज सकाळी बारामती येथे भंगाराच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माळरान, डोंगराळ भागात सद्यस्थितीत उन्हामुळे वणवे पेटू लागले आहेत. त्यामुळे त्याच्या आसपास असणाऱ्या परिसरात आगीच्या घटना घडू लागली आहेत. नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन अग्निशमन दलाकडून केले जात आहे.