शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

सातारा रस्त्यावरील पॅकिंगच्या कंपनीत भीषण आग 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 11:28 AM

सातारा रस्त्यावरील एका पॅकिंगच्या कंपनीत पहाटे भीषण आग लागली.

ठळक मुद्देअग्निशामक दलाला पहाटे तीन वाजता या आगीची माहिती अग्निशामक दलाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाने पहाटे ५ वाजता आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य

पुणे : सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टीफ्लेक्ससमोर असलेल्या एका पॅकिंगच्या कंपनीत पहाटे भीषण आग लागून त्यात लाकडी सामान मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले़. भापकर पेट्रोल पंपाच्यामागे पर्वती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये शिरुरकर सॉ मिल ही पॅकिगचे मटेरियल तयार करणारी कंपनी आहे़.या कंपनीत पहाटे तीन वाजता अचानक आग लागली़. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून कंपनीचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अजून स्पष्ट होऊ शकले नाही. अग्निशामक दलाला पहाटे तीन वाजता या आगीची माहिती मिळाली़. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा कंपनी बंद होती़. कंपनीत रखवालदारही दिसून आले नाहीत़. अग्निशामक दलाच्या ५ गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या़ मोठ्या वस्तूंच्या पॅकिंगसाठी तळाला जो लाकडाचा सांगाडा तयार केला जातो़, त्याचे काम या कंपनीत केले जाते़. सुमारे १० हजार स्क्वेअर फुटच्या आवारात ही आग लागली होती़.अग्निशामक दलाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाने पहाटे ५ वाजता आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले़. येथे मोठ्या प्रमाणावर लाकडी फळ्या ठेवण्यात आल्या आहेत़. आगीत त्या संपूर्णपणे जळून खाक झाल्या़. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग अधिक पसरून नेणे व चांगल्या मालापर्यंत पोहचू नये, म्हणून काळजी घेतल्याने तयार माल आगीपासून वाचला आहे़. त्यावेळी कंपनी बंद होती़. कंपनीत रखवालदारही दिसून आले नाहीत़.लाकडी फळ्यांना आग लागून त्याचे निखारे झाले असल्याने अधून मधून त्यातून धूर येत आहे़. जेसीबीच्या सहाय्याने या जळालेल्या फळ्या बाजूला करुन त्यांना विझविण्याचे काम गेल्या ७ तासापासून सुरु आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल