मार्केटयार्डमध्ये गोदामाला आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 15:57 IST2018-04-02T15:57:55+5:302018-04-02T15:57:55+5:30

मार्केटयार्ड येथील नेहरू रस्त्यावर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या समोरील गाळा क्र.७८ व ७९ च्यामध्ये असलेल्या जागेत अनाधिकृत गोदाम तयार केलेले होते.

Fire in Marketyard | मार्केटयार्डमध्ये गोदामाला आग 

मार्केटयार्डमध्ये गोदामाला आग 

ठळक मुद्देगोदामामध्ये तळ घर तयार करून धान्यांसाठी लागणाऱ्या पोत्यांची साठवणूक

पुणे : मार्केटयार्ड येथील नेहरू रस्त्यावर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या समोरील गाळा क्र.७८ व ७९ च्यामध्ये असलेल्या जागेत अनाधिकृत गोदाम तयार केलेले होते. त्या गोदामामध्ये तळ घर तयार करून धान्यांसाठी लागणाऱ्या पोत्यांची (बारदाणा) साठवणूक केलेली होती. या गोदामाला सोमवारी दुपारी  बारा वाजण्याच्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले. आगीची माहिती समजताच सेंट्रल व कोंढवा अग्निशमन दलाची गाडी,दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. तीन तास आग विझवण्याचे काम सुरु होते. जेसीबी मशीनच्या साह्याने तळ घर तोडत काम आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तीन तासांच्या मदतीने अखेर अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश मिळाले.आली. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. 

Web Title: Fire in Marketyard