वेळू येथे हार्डवेअरच्या दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:29+5:302021-02-05T05:05:29+5:30

खेड शिवापूर: वेळू फाटा येथील शिवम हार्डवेअर दुकानात रविवारी रात्री ११ सुमारास आग लागली. या आगीमध्ये दुकानातील सर्व ...

Fire at a hardware store in Velu | वेळू येथे हार्डवेअरच्या दुकानाला आग

वेळू येथे हार्डवेअरच्या दुकानाला आग

खेड शिवापूर: वेळू फाटा येथील शिवम हार्डवेअर दुकानात रविवारी रात्री ११ सुमारास आग लागली. या आगीमध्ये दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. आगीची तीव्रता एवढी होती की सुमारे तीन तासानंतर स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नांनी विझवण्यात यश मिळवले. परंतु सर्व बस्तू भस्मसात झाल्या होत्या.

किरण दौलत गिरीगोसावी याने हार्डवेअर चे दुकान चार पाच वर्षापासून चालवत होता. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास दैनंदिन कामकाज आटपुन हे दुकान बंद करून दुकानाचा मालक घरी निघून गेला होता. स्थानिक नागरिकांना रात्री अकराच्या सुमारास दुकानाच्या मधून धूर येताना दिसला. दुकान उघडण्यात आल्यावर आगीने उग्ररूप धारण केले.

फोटो

Web Title: Fire at a hardware store in Velu