पुण्यातील लोहियानगर परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 00:25 IST2020-11-24T00:23:55+5:302020-11-24T00:25:11+5:30
सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

पुण्यातील लोहियानगर परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग
पुणे: पुण्याच्या लोहिया नगर परिसरात एका घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात आठ ते दहा झोपड्यांनी पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहिया नगर परिसरात रात्री 10 ते 11 च्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. झोपडपट्टीचा परिसर असल्याने आगीची तीव्रता वाढण्याची शक्यता होती.परंतु, अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.काही वेळानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले.