पुण्यातील ताडीवाला राेड येथील एका कंपनीच्या कार्यालयाला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 13:45 IST2020-01-01T13:45:10+5:302020-01-01T13:45:43+5:30

ण्यातील ताडीवाला राेड येथील एका कंपनीच्या ऑफीसला आग लागली. या आगीत ऑफीसचे माेठे नुकसान झाले.

Fire breaks out at a company office in Tadivala Raod, Pune | पुण्यातील ताडीवाला राेड येथील एका कंपनीच्या कार्यालयाला आग

पुण्यातील ताडीवाला राेड येथील एका कंपनीच्या कार्यालयाला आग

पुणे : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुण्यातील ताडीवाला राेड येथील एका पाेलारीस नामक कंपनीच्या ऑफीसला सकाळी आग लागली. या आगीत ऑफीसमधील सर्व सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग आटाेक्यात आणली. या आगीत ऑफीसचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. 

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 8. 48 च्या सुमारास ताडीवाला राेड येथील चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या पाेलारीस कंपनीच्या कार्यालयाला आग लागली. आगीची माहिती मिळताच दयाराम राजगुरु अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तीन फायर इंजिनच्या सहाय्याने जवानांनी आग आटाेक्यात आणली. यात कुठलिही जीवीत हानी झाली नाही. परंतु ऑफीसचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. ऑफीसमधील फाईल्स, काॅम्प्युटर, फर्निचर आदी जळून खाक झाले. दरम्यान शाॅकसर्किटमुळे आग लागली असण्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने आग आटाेक्यात आणल्याने आगीची झळ शेजारील इतर ऑफीसेसला बसली नाही. 

Web Title: Fire breaks out at a company office in Tadivala Raod, Pune