लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या जेके सेल्सच्या गोडाऊनला रविवारी(दि. १९) रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सुमारे २ कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामुळे ऐन दिवाळीत दुकानदारावर मोठे संकट कोसळले आहे.
कदमवाकवस्ती येथील जेके सेल्स हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीचे नामवंत दुकान आहे. हे दुकान अक्षय काळभोर व फिरोज खान मेटकरी हे दोघे भागीदारी तत्वावर चालवितात. या दुकानातून टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, कुलर, एसी, पिठाची गिरणी, फॅन, गिझर, फिल्टरसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री केली जाते. या दुकानाचे गोडाऊन शिवम हॉस्पिटलच्या रस्त्यावर आहे. या गोडावूनमध्ये अंदाजे २ कोटींहून अधिक रुपयांचा माल ठेवलेला होता. दरम्यान, काही नागरिकांना गोडाऊनच्या बाहेर वायरचे शॉर्टसर्किट झाल्याचे रविवारी (ता.१९) रात्री आढळून आले. आणि गोडाऊनच्या दिशेने जाणारी वायर जळत असताना दिसली. त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती तत्काळ जेके सेल्सचे संचालक अक्षय काळभोर व फिरोज खान मेटकरी यांना दिली. घटनास्थळावर पोहचेपर्यंत गोडाऊनच्या शटर मधुन मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत होता. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले होते. गोडाऊन भक्ष्यस्थानी पडले. या घटनेची माहिती तत्काळ हडपसर येथील अग्निशामक दलाला देण्यात आली. तोपर्यंत नागरिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीचे लोट बाहेर पडत होते. शेवटी जेके सेल्सच्या संचालक आणि कामगारांनी गोडावूनचे चारही शटर तोडून टाकले. आणि वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व वस्तूंनी पेट घेतला होता.यादरम्यान, फ्रीजमधील गॅसचा स्फोट झाला. त्यावेळी नागरिकांची पळापळ झाली. त्यानंतर अर्ध्या तासानंतर हडपसर येथील अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केला परंतु, आग पूर्णपणे आटोक्यात आली नव्हती. त्यानंतर अग्निशामक दलाची दुसरी गाडी बोलावण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आग पूर्णपणे विझविण्यात यश आले.
परंतु, तोपर्यंत आगीत सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या. मागील महिन्यात याच व्यवसायिकाचे पुराच्या पाण्यामुळे ३ कोटींचे नुकसान झाले होते. नुकसान मागील एक महिन्यापूर्वी कदमवाकवस्ती येथे अतिवृष्टी झाली होती. यावेळी जेके फर्निचर, जेके सेल्स इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊन, आर वर्ड इंटरियर मॉड्युलर फॅक्टरी या तीन व्यावसायिक दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे ३ कोटींहून अधिक रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले होते. त्यातच आता जेके सेल्स इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊन जळून खाक झाले आहे. यामध्ये २ कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. असे एकूण ५ कोटी रुपयांचा दुकानदाराला फटका बसला आहे.
Web Summary : A fire destroyed a Pune electronics store during Diwali, causing significant losses. This follows previous flood damage, compounding the owner's financial woes. Estimated losses are in the crores.
Web Summary : पुणे में दिवाली के दौरान एक इलेक्ट्रॉनिक्स की दुकान में आग लगने से भारी नुकसान हुआ। पहले बाढ़ से भी नुकसान हुआ था, जिससे मालिक की आर्थिक परेशानी बढ़ गई। अनुमानित नुकसान करोड़ों में है।