शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
3
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
4
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
5
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
6
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
7
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
8
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
9
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
10
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
11
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
12
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
14
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
15
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
16
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
17
अलिबागमधील आक्षी समुद्रकिनाऱ्यावर बिबट्याचा धुमाकूळ, दोन जणांवर हल्ला
18
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
19
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
20
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
Daily Top 2Weekly Top 5

तळजाई टेकडीवर पुन्हा आगीच्या झळा, बेपर्वाईमुळे वन संपत्तीची राख, एक एकरचा परिसर जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 09:44 IST

टेकडीवर आग लागली जाते का? आग लावली जाते? हे वन विभागाने पाहणे गरजेचे आहे

धनकवडी : तळजाई टेकडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असून बेपर्वाईच्या झळांमुळे वन संपत्तीची राख रांगोळी होत आहे. तळजाई टेकडी वन विभागात सोमवारी (दि. १७) रात्री आठच्या सुमारास आग लागली असून एक एकरचा परिसर जळून खाक झाला तर  झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांती पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आग अन्यत्र पसरू न देण्याची काळजी जवानांनी घेतली. 

याठिकाणी वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. आठ दिवसांत चार वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून मानवी बेपर्वाईमुळे अनमोल वन संपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. या समस्येला भिडण्याचे आव्हान प्रशासना समोर उभे ठाकले आहे..याठिकाणी आगीच्या घटना पाहता आग लागली जाते का ? लावली जाते? हे वन विभागाने पाहणे गरजेचे आहे आणि आगीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

पुणेकरांसाठी तळजाई टेकडी म्हणजे मोकळा श्वास घेण्यासाठी हाकेच्या अंतरावर असलेले ठिकाण. तळजाई टेकडी ही स्वारगेट पासून जवळ आहे. तळजाई टेकडी हे चांगले पर्यटनस्थळही आहे. आजमितीला तळजाई टेकडीला भेट देणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढत आहे. दरम्यान टेकडीवर बेकायदा वृक्षतोड होत असतानाच दर वर्षी उन्हाळ्यात वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. वनात पत्ते व दारूचे अड्डे तयार झाल्याने वनपरिसरात प्रचंड प्लॅस्टिक व तत्सम कचरा साचत आहे. या गोष्टींचा परिणाम येथील पक्षी व प्राण्यांच्या अस्तित्वावर होऊ लागला आहे. 

चैत्र-वैशाखात पारा वाढून उन्हे तापू लागली, कीआग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. नैसर्गिक क्रियांमुळे आगी लागत असल्याचे दावे होत असले, तरी त्यात पूर्ण तथ्य व सत्य नाही. मानवनिर्मित कारणेच प्रामुख्याने आग भडकवतात. वणव्याच्या विस्तवावर स्वत:ची पोळी भाजून घेणारे अनेक असतात. त्यात अवैध उत्खनन व इतर बेकायदा कृत्ये करणाऱ्यांचा प्रमुख भरणा असतो.मानव निर्मित वणव्याच्या भक्ष्यस्थानी हे सर्व काही पडते तेव्हा मोठा नाश होत असतो. - सुशांत ढमढेरे पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, पद्मावती 

जंगलात वणवा पेटला की पेटवला, या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळू शकलेले नाही. वने आणि वन्यजीवांसह येणाऱ्या मानवी पिढ्यांचीही आपण होरपळ करून घेत आहोत, हा साधा विचारही मनात न येणे, हे दुर्दैवच. वणव्यामागची खरी श्वापदे शोधली जायला हवीत अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेSahakar Nagarसहकारनगरfireआगforest departmentवनविभागpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणNatureनिसर्ग