पुण्यातील विमाननगर भागातील बेकर्स कंपनीला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 08:39 IST2019-08-30T08:38:27+5:302019-08-30T08:39:48+5:30

पुण्यातील विमाननगर भागातील बेकर्स कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली.

fire break out at bakers company in vimannagar | पुण्यातील विमाननगर भागातील बेकर्स कंपनीला आग

पुण्यातील विमाननगर भागातील बेकर्स कंपनीला आग

पुणे : पुण्यातील विमाननगर भागातील बेकर्स नामक कंपनीच्या प्राेडक्शन युनिटला आग लागल्याची घटना आज सकाळी 6.15 च्या सुमारास घडली. या आगीत कंपनीचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटाेक्यात आणण्यात आली असून सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. दरम्यान या आगीत कुठलिही जीवीत हानी झाली नाही. 

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 6.15 च्या दरम्यान विमाननगर भागातील बेकर्स नामक कंपनीत भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. आगीचे माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दाेन फायर गाड्या आणि एक टॅंकर घटनास्थळी दाखल झाले. आगीने राैद्र रुप धारण केले हाेते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटाेक्यात आणली. सध्या कुलिंग ऑपरेशन करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार या आगीत काेणीही जखमी किंवा जीवीत हानी झाली नाही. आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. 
 

Web Title: fire break out at bakers company in vimannagar