नाना पेठ वाड्याला आग; रात्री ८ वाजता लागल्याची प्राथमिक माहिती, फायरगाड्या घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 23:06 IST2025-04-06T23:05:21+5:302025-04-06T23:06:48+5:30

या घटनेत कोणी मृत वा जखमी नसून आगीचे कारण आत्ता तरी समजू शकले नाही...

fire at nana peth wada initial information fire engines are at the scene | नाना पेठ वाड्याला आग; रात्री ८ वाजता लागल्याची प्राथमिक माहिती, फायरगाड्या घटनास्थळी

नाना पेठ वाड्याला आग; रात्री ८ वाजता लागल्याची प्राथमिक माहिती, फायरगाड्या घटनास्थळी

पुणे: आज राञी 08:08 वाजता नाना पेठ, राम मंदिराजवळ, पारेख वाड्याला आग लागल्याची माहिती मिळताच दलाकडून तातडीने फायरगाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. घटनास्थळी पोहोचल्यावर जवानांनी तीन मजली लाकडी जुन्या वाड्याला आग भीषण आल्याचे पाहताच अतिरिक्त मदत मागवण्यात आली असता अग्निशमन दलाकडून एकुण 10 फायरगाड्या 4 वॉटर टँकर 2 देवदूत वाहने तसेच व्हेईकल डेपोकडून पाच वॉटर टँकर रवाना करण्यात आले.

जवानांनी वाड्याच्या तीन ही बाजूच्या रस्त्याला अग्निशमन वाहने उभी करुन पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. तसेच वाड्यात कोणी राहत नसल्याची खाञी करत कोणी जखमी नसल्याची खातरजमा केली. धूर मोठ्या प्रमाणात असल्याने शेजारी असलेल्या रहिवाशी इमारती मधून सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले. घरामधील सिलेंडर बाहेर घेत मोठा धोका टाळला व आग इतरञ पसरणार नाही याची दक्षता घेत सुमारे तासाभरात आगीवर नियंञण मिळवत कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवले आहे. 

सदर ठिकाणी पूर्ण बाजारपेठेचा परिसर असून रस्त्याचे काम सुरु आहे. रस्ता अरुंद व काम सुरु असल्याने अग्निशमन वाहने जाण्यास अडथळा निर्माण झाला होता.

अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी आगीच्या ठिकाणी उपस्थित राहून अग्निशमन दलाचे जवळपास पाच अधिकारी व किमान साठ ते सत्तर जवानांना मार्गदर्शन करत आहेत.

या घटनेत कोणी मृत वा जखमी नसून आगीचे कारण आत्ता तरी समजू शकले नाही...

Web Title: fire at nana peth wada initial information fire engines are at the scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.