शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

उद्योजक आणि भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 2:24 PM

उद्योजक आणि भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  न्यू कोपरे गावातील 17 एकर जमीन काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीने बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पुणे, दि. 17 -  उद्योजक आणि भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  न्यू कोपरे गावातील 17 एकर जमीन काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीने बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर असून, या प्रकरणी कंपनीचे संचालक खासदार संजय काकडे,  सूर्यकांत काकडे यांच्यासह अशोक यादव आणि अन्य एकाविरोधात भादंवि कलम 420, 406, 467 आणि 468 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   न्यू कोपरे गावातील रहिवाशांची फसवणूक झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने या प्रकरणात चौकशी करून काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक खासदार संजय काकडे, सूर्यकांत काकडे आणि इतर संचालकांची फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ई. टी. गोटे यांनी दिले होते.  मात्र काकडे यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळले आहेत.न्यू कोपरे गावातील रहिवाशांनी १४ एकर जमीन सूर्यकांत काकडे यांना विकसनासाठी दिली होती. मात्र कागदपत्रात खाडाखोड करून एकूण ३८ एकर जमीन घेण्यात आली, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. यापैकी महापालिकेला ७ एकर जमीन ‘अ‍ॅमिनिटी स्पेस’ म्हणून देण्यात आली. उर्वरित १७ एकर जमीन काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीने बळकावल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यातील काही भागावर बांधकाम करण्यात आले, तर काही भागातील प्लॉट विकण्यात आले. याबाबत गावकºयांनी न्यायालयात धाव घेतली होती.  एक रहिवासी दिलीप मोरे यांनी दाखल केलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रथमवर्ग न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. फसवणूक झाल्याचे दिसत असल्याने गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले  होते.काकडे यांच्याकडून यापूर्वी मांडलेल्या भूमिकेनुसार, पुनर्वसनाचा हा अधिकार जिल्हाधिका-यांकडे होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या यादीनुसार पुनर्वसन करण्यात येत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांकडे पाठपुरावा करायला हवा. काही जणांची घरे नियमानुसार तयार करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी घेतलेली नाहीत. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाबाबत संजय काकडे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

टॅग्स :BJPभाजपाPuneपुणेCrimeगुन्हा