शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पुणेकरांवर आली कबुतर जा जा म्हणण्याची वेळ ; महापालिकेने उचलले " हे " पाऊल...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 8:21 PM

कबुतर व पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार

ठळक मुद्देकबुतर-पारव्यांना धान्य टाकणाऱ्या लोकांना दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यास सुरुवात कबुतर व पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार

पुणे : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सर्व जण प्रयत्न करीत असतानाच, सार्वजनिक ठिकाणी कबुतर-पारव्यांना धान्य टाकून ‘पुण्य’ कमावण्याचा सोस बाळगणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झालेली नाही.  मानवी आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या अनेक घातक विषाणूंचा प्रसार करणाऱ्या या कबुतर-पारव्यांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर रोखण्यासाठी आता महापालिकेने कारवाई करण्याचे ठरवले आहे. कबुतर व पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.उद्याने, मैदाने, चौक, सार्वजनिक ठिकाणे, नदी पात्र अशा अनेक ठिकाणी कबुतर-पारव्यांना काही लोक धान्य टाकत असतात. अशा लोकांची माहिती जागरुक पुणेकरांनी महापालिकेला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.राज्यातल्या अनेक महापालिकांनी सार्वजनिक ठिकाणी कबुतर-पारव्यांना धान्य टाकणाऱ्या लोकांना दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तशेखर गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘‘शहरात अनेक ठिकाणी विशेषत: मोकळ्या जागी, इमारतींच्या गच्चीवर व किराणा मालाच्या दुकानांसमोर पारव्यांना, कबुतरांसाठी धान्य टाकण्यात येते़ परंतु या पक्ष्यांची विष्ठा व पिसे ही सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी पडल्याने विविध आजारांना निमंत्रण मिळते़ या आजाराचा संसर्गही घातक असून, या पक्ष्यांना धान्य टाकून आमंत्रित करण्याची कायद्याने बंदी आहे़ परंतू आजमितीला याकडे दुर्लक्ष करून अनेक जण या पक्ष्यांना धान्य टाकून त्यांना गोळा करतात. त्यामुळे या पक्ष्यांचा वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपद्रवही वाढला अ़ाहे़ परिणामी आता महापालिका कबुतर व पारव्यांना धान्य टाकून आमंत्रित करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे़’’ कबुतर-पारव्यांना धान्य टाकण्याच्या कृत्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने सध्या मुंबई महापालिका अशा व्यक्तींना दहा हजार रुपये दंड ठोठावते. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकाही शहरात अशा व्यक्तींकव दंडात्मक कारवाई करणार असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले़ 

टॅग्स :Puneपुणेcommissionerआयुक्तCrime Newsगुन्हेगारी