Pune | गायब लोको पायलट शोधा अन्यथा एकही रेल्वे चालू देणार नाही; NRMU संघटनेचा इशारा
By नितीश गोवंडे | Updated: December 5, 2022 13:29 IST2022-12-05T13:26:26+5:302022-12-05T13:29:12+5:30
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून लोको पायलट गायब...

Pune | गायब लोको पायलट शोधा अन्यथा एकही रेल्वे चालू देणार नाही; NRMU संघटनेचा इशारा
पुणे : वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून ५५ तासांपासून बेपत्ता झालेला लोको पायलट हरिषचंद्र अंकुश याला रेल्वे प्रशासनाने त्वरित शोध घ्यावा. अन्यथा पुण्यातून एकही रेल्वे चालू देणार नाही, असा इशारा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
९ तासांची ड्युटी पूर्ण केल्यानंतर पुन्हा एक तास ओव्हरटाईम केलेल्या लोको पायलटला वरिष्ठांनी अजून चार ते पाच तास ड्युटी करण्यास सांगितले होते. यावेळी लोको पायलटने मला विश्रांतीची गरज असल्याचे वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्याला अत्यंत खालच्या शब्दांमध्ये फोनवर सुनावण्यात आले. तसेच जर आमच्या ऐकले नाही तर बदली करू अशी धमकीही दिली.
यानंतर ड्युटी पूर्ण करून संबंधित रेल्वे चालक घरी गेला असता, त्याला दुसऱ्या दिवशी मिरजला बदली करण्यात आल्याचा मेसेज फोनवर आला. यानंतर मी ऑफिसला जाऊन येतो असे पत्नीला सांगून घरातून बाहेर पडलेला लोको पायलट पुन्हा आजपर्यंत घरी आलाच नाही.
शनिवारपासून गायब असलेला लोको पायलट सोमवारपर्यंत ना नोकरीला आला होता ना घरी गेला होता. त्यामुळे त्याच्या पत्नीसह रेल्वे युनियनने सोमवारी सकाळी डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन करत ४८ तासांमध्ये त्याला हुडकून आणा अन्यथा पुण्यावरून एकही रेल्वे चालू देणार नाही, असा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे.