शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'सोमेश्वर'मध्ये आर्थिक गैरव्यवहार; लेबर व टाइम ऑफिस विभागातील कर्मचाऱ्यांचे केले निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:08 IST

सोमेश्वर कारखान्याच्या प्रगतीमध्ये अडसर ठरेल व कारखान्याचे नुकसान होईल...

सोमेश्वरनगर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये रोजंदारी बेसिसवर काम करणारे कर्मचारी व कामगार यांच्या हजेरी नोंदीमध्ये संगनमताने कारखाना प्रशासनाची फसवणूक करून आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कारखान्याचे लेबर व टाइम ऑफिस विभागातील लेबर ऑफिसर, हेड टाइम किपर, टाइम किपर, सर्व क्लार्क्स व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

२७ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडलेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये घेतला असून, सोबतच या सर्वाविरोधात व लेबर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांवर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, सोमेश्वर कारखान्याच्या प्रगतीमध्ये अडसर ठरेल व कारखान्याचे नुकसान होईल असे काही अधिकारी, कामगारांनी कामकाज केल्याचे निदर्शनास आल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. नियमानुसार कायदेशीर मुद्दे विचारात घेऊन याप्रकरणाची इंडस्ट्रीयल व लेबर न्यायालयामध्ये काम पाहणाऱ्या तज्ज्ञ वकिलांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून सखोल तपास होईल.

कठोर कारवाई होणारसन २०१५ पासून आजअखेरपर्यंत रोजंदारी कर्मचाऱ्यांची हजेरी नोंद व प्रत्यक्ष दिलेला पगार, झालेले कामकाज आदींची मान्यताप्राप्त सनदी लेखापालामार्फत ऑडिट करून चौकशी करण्याचा निर्णयदेखील घेतला आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कठोरपणे कारवाईचा संचालक मंडळाने निर्णय घेतलेला असून, यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही पुरुषोत्तम जगताप म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखानेBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचार