शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Satish Wagh : आमदार योगेश टिळकरांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून; पुण्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 19:58 IST

आज सायंकाळी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला.

- किरण शिंदेपुणे -पुणे  शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आला आहे. सतीश वाघ यांचे आज पहाटे अपहरण करण्यात आले होते. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या सतीश वाघ यांना चौघांनी जबरदस्तीने एका गाडीत बसवले आणि अपहरण केले होते. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत होते. मात्र आज सायंकाळी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला.सतीश वाघ हे हडपसरच्या मांजरी परिसरात कुटुंबीयांसह राहत होते. वाघ कुटुंबीयांचे मांजरी परिसरात लॉन्स आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात शेती ही आहे. अतिशय शांत म्हणून ओळख असलेले सतीश वाघ नेहमीप्रमाणे आज पहाटे मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडले होते. मांजरी येथील घरातून बाहेर पडल्यानंतर काही अंतर जाताच त्यांचे अपहरण झाले होते. दबा धरून बसलेल्या चार जणांनी एका चार चाकी गाडीत त्यांना जबरदस्तीने बसवले आणि पळवून नेले होते. दरम्यान या ठिकाणी सुरू असलेला आरडाओरडा पाहून एका व्यक्तीने वाघ यांच्या कुटुंबीयांना झालेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर वाघ कुटुंबीयांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.दरम्यान, तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. मांजरी परिसरातील आकाश लॉन्स याठिकाणी असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरातही अपहरणाचा हा प्रकार कैद झाला होता. चार जणांनी एका चार चाकी गाडीत जबरदस्तीने सतीश वाघ यांना बसवल्याचे दिसून आले होते. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत होते. हडपसर पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीच्या तपासासाठी रवाना करण्यात आली होती. दरम्यान सायंकाळपर्यंत या प्रकरणात कोणतीही नवीन माहिती समोर आली नव्हती. दरम्यान आता मात्र धक्कादायक माहिती समोर आली असून सतीश वाघ मृतवस्थेत सापडले आहेत. पुणे ग्रामीण परिसरातील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांचा मृतदेह सापडला आहे.या खुनाच्या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे. सत्ताधारी पक्षाचा लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाचे अपहरण करून खून होत असेल तर सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. पाच दिवसात खुनाचे पाच प्रकार घडले होते. याशिवाय घरफोड्या, हाणामारी, वाहनांची तोडफोड यासारख्या घटना सातत्याने घडत आहे. असं असताना आता अपहरण करून खून करण्यात आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यातील आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान आता पुणे पोलिसांसमोर असणार आहे.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHadapsarहडपसरyogesh tilekarयोगेश टिळेकरCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणPoliceपोलिस