शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भोर नगरपालिकेची विशेष सभा झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2015 23:07 IST

नगरपालिकेतील राजकीय वादामुळे शहरातील विकासकामांची कोंडी झाली आहे. सभाच होत नसल्याने कामांना मंजुरी मिळत नव्हती.

भोर : नगरपालिकेतील राजकीय वादामुळे शहरातील विकासकामांची कोंडी झाली आहे. सभाच होत नसल्याने कामांना मंजुरी मिळत नव्हती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या विशेष परवानगीने आज विशेष सभा झाली. त्यात विविध कामांसाठी सुमारे ४ कोटी २८ लाख रुपयांच्या विकासकामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली, मात्र, नगराध्यक्षा दीपाली शेटे मात्र या सभेलाही गैरहजर राहिल्या.वेळोवेळी मागणी करूनही नगराध्यक्षा दीपाली शेटे यांनी सभेचे आयोजन केले नाही. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन सभेचे आयोजन करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २० मे रोजी सभेचे आयोजन करून सभेचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांची निवड केली होती.आज दुपारी एक वाजता नगरपालिकेच्या शिवाजी सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. या वेळी काँग्रेसचे सर्व नगरसेवक तर राष्ट्रवादीचे ३ जण हजर होते. या सभेमुळे भविष्यात शहरातील वीज, पाणी, कचरा हे प्रश्न मार्गी लागणार आहेत. शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सभेलाच नगराध्यक्षा गैरहजर राहिल्या असा आरोप पत्रकार परिषदेत काँग्रेस नगरसेवकांनी केला. या वेळी उपनगराध्यक्ष तानाजी तारु,नगरसेवक चंद्रकांत सागळे, उमेश देशमुख, अ‍ॅड. जयश्री शिंदे, डॉ. विजयालक्ष्मी पाठक, गजानन दानवले, तृप्ती किरवे, देविदास गायकवाड उपस्थित होते. भोर शहराचा विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे पाठवण्यासाठी नगराध्यक्षांकडे सही करण्यासाठी तो पाठवला. मात्र, त्यावर त्यांनी सही केली नाही. आराखड्यावर त्यांची हरकत होती. हरकत घेण्यासाठी ३ डिसेंबरच्या सभेला हजर नव्हते. आणि आता पाच महिने झाल्यावर आमदार व नगरसेवकांवर सूडबुद्धीने बिनबुडाचे आरोप केले. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे काँग्रेस नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस नगरसेवकांनी विकास आराखडा समितीत मला घेतले नाही आणि आराखडा बनवताना विश्वासात न घेताच नगरसेवकांचे हितसंबंध जपणारा आराखडा तयार करण्यात आला. शिवाय या संंबंधीचे सर्व अधिकार मुख्याधिकारी यांनाच दिल्याने मी आराखड्यावर सही केली नाही, असे नगराध्यक्षा दीपाली शेटे यांनी सांगितले. (वार्ताहर)