शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

... अखेर माळेगावच्या नगरपंचायतीवर शिक्कामोर्तब; फटाके वाजवत 'राष्ट्रवादी'कडुन जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 16:13 IST

मागील ५ महिन्यांपासून सुरू असलेला संभ्रम दूर...

माळेगाव : राज्य शासनाकडून माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीवर शिक्कामोर्तब झाला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामपंचायत की नगरपंचायत असा संभ्रम निर्माण झालेल्या माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्याचे जाहीर करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत नगर विकास सचिवाने तब्बल तीन वेळा नगरपंचायतची उदषोषणा करण्यात आली होती.मात्र निवडणूक आयोगाकडून ठोस निर्णय झाला नसल्याने ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ७७ उमेदवारापैकी ७६ जणांनी सामुहिक अर्ज माघारी घेतल्याने ग्रामपंचायत निवडणूक होऊ शकली नाही.त्यामुळे गेली पाच महिने झाले ग्रामपंचायत की नगरपंचायत याबाबत चर्चांना उधाण आले होते. अखेर राज्याच्या नगर विकास उप सचिवांनी राज्यपालांच्या आदेशानुसार माळेगाव ग्रामपंचायत रद्द करून नगरपंचायत जाहीर केल्याचे नोटिसीद्वारे प्रसिद्ध केले. दरम्यान नगरपंचायत बाबत नोटीस जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजहंस चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.यावेळी माजी सभापती संजय भोसले,माजी सरपंच जयदीप तावरे, आप्पा बनसोडे, दादा जराड, इम्तियाज शेख, निखिल माने, प्रविण जगताप, रणजित माकर, दयावान जराड, प्रितम चव्हाण, युवराज जेधे, पप्पु भोसले, सोनु शेख उपस्थित होते. दरम्यान माळेगाव नगरपंचायतीची अंतिम रचना होत नाही तोपर्यंत नगरपंचायतीची कार्य व कर्तव्य पार पाडण्यासाठी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याचे उपसचिव मोघे यांनी पत्रात नमूद केले आहे.------------------

टॅग्स :Baramatiबारामतीgram panchayatग्राम पंचायतState Governmentराज्य सरकार