शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

मंडपाचे खड्डे स्वखर्चाने बुजवा, ३ दिवसांत अतिक्रमणे काढा; पुणे महापालिकेची मंडळांसाठी नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:45 IST

नागरिकांना वाहतूक करताना अडथळा हाेणार नाही, ध्वनी प्रदूषणाचा त्रास हाेणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

पुणे: महापालिकेने काही दिवसांवर आलेल्या गणेशाेत्सव आणि नवरात्राेत्सवासाठी नियमावली केली असून, उत्सव मंडपासाठी घेतलेले खड्डे स्वखर्चाने बुजवावेत, उत्सवानंतर तीन दिवसांत मंडप, सजावट काढून जागा माेकळी करावी आदी नियमांचा यात समावेश आहे. महापालिकेकडून सार्वजनिक गणेश व नवरात्रोत्सवाचा मंडप, रनिंग मंडप व स्वागत कमानींसाठी दरवर्षी परवानगी दिली जाते. मात्र, २०२२ पासून पाच वर्षांसाठी एकदाच हे परवाने देण्यात आले आहेत. नवीन गणेश मंडळांना मात्र २०१९ च्या नियमावलीनुसार परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच विविध परवानगी घेण्यासंदर्भात पुणे पाेलिस, महापालिका एक खिडकी याेजना सुरु करणार आहे.

या उत्सवासाठी महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार, मंडपाची उंची चाळीस फुटांपेक्षा जास्त असू नये, त्यापेक्षा अधिक उंच मंडप असेल तर स्थापत्य अभियंत्याकडून त्या मंडपाचा स्थिरता अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. कमानींची उंची ही अठरा फुटांपेक्षा अधिक असावी, त्याठिकाणी सुरक्षात्मक उपाय म्हणून स्वयंसेवक किंवा सुरक्षारक्षक नियुक्त करावेत तसेच ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात शासकीय नियमांचे पालन करावे, अशा विविध सूचनांचा समावेश आहे.

उत्सव संपल्यानंतर मंडळांनी सजावटीचे साहित्य, मंंडप आदी अतिक्रमणे स्वखर्चाने काढून घ्यावीत. तसेच मंडपासाठी खाेदलेले खड्डे सिमेंट काँक्रीटने दुरुस्त करणे बंधनकारक असल्याचे यात नमूद केले आहे. नागरिकांना वाहतूक करताना अडथळा हाेणार नाही, ध्वनी प्रदूषणाचा त्रास हाेणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : http://complaint.punecorporation.org, टाेल फ्री क्रमांक : १८०० १०३ ०२२२, माेबाईल ॲॅप : PUNE Connect, व्हाॅट्सॲप क्रमांक : ९६८९९००००२ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Socialसामाजिकroad safetyरस्ते सुरक्षाpollutionप्रदूषणtraffic policeवाहतूक पोलीस