भिडे गुरुजींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्‍या हेमंत पाटील यांच्यावर संचारबंदी भंगाचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 01:34 PM2020-04-02T13:34:23+5:302020-04-02T13:50:28+5:30

कोरोना विषाणूविषयी संभाजी भिडे गुरुजी यांची मुलाखत काही वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झाली होती.

Filed a case against Hemant Patil who demands crime register against Bhide Guruji | भिडे गुरुजींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्‍या हेमंत पाटील यांच्यावर संचारबंदी भंगाचा गुन्हा 

भिडे गुरुजींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्‍या हेमंत पाटील यांच्यावर संचारबंदी भंगाचा गुन्हा 

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई

पुणे : कोरोना बाधितांना बरे करण्याचा दावा करणार्‍या संभाजी भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात आलेल्या ' भारत अगेस्ट करप्शन ' या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी संचारबंदी भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
देशभरात कोणतीही गोष्ट झाली की, त्याविरुद्ध न्यायालयात अर्ज करणे, पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन त्याचे प्रसिद्धी पत्रक हेमंत पाटील नियमित काढत असतात. मात्र, त्यांची ही मागणी करण्याची पद्धत संचारबंदी असल्याने त्यांच्या अंगाशी आली आहे. कोरोना विषाणूविषयी संभाजी भिडे गुरुजी यांची मुलाखत काही वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे पत्र घेऊन हेमंत पाटील हे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत बुधवारी सायंकाळी आले होते. 
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांना उपनिरीक्षक रवींद्र गोडसे व हवालदार डांगे यांनी हेमंत पाटील हे आले असल्याचे सांगितले. त्यांनी संभाजी भिडे विरोधात महाराष्ट्र कोविड १९ अधिनियम कलम ६ प्रमाणे कायदेशीर कारवाई करुन अटक करण्याबाबत पत्र घेऊन आलेले आहेत असे सांगितले. ही बाब संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये लागू होत नसल्याने व शासनाच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास कळविण्यात आले. त्यानुसार हवालदार नवनाथ डांगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारत अगेस्ट करप्शन या संघटनेचे अध्यक्ष हेमंत बाबुराव पाटील (वय ५०, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Read in English

Web Title: Filed a case against Hemant Patil who demands crime register against Bhide Guruji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.