शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जमीन ताब्यात घेण्यासाठी गावात लष्कराला आणणाऱ्या कर्नलवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 22:35 IST

गुळाणी येथे कर्नल केदार विजय गायकवाड हे ४ लष्कराच्या गाड्यांमधून 30 ते ४० जवानांना घेऊन शस्त्रासह गावात आले होते.

दावडी : राजगुरूनगर (दावडी) : खेड तालुक्यातील गुळाणी येथे एका लष्करी कर्नलने जमिनीचा ताबा घेण्यासाठी चक्क 30 ते 40 जवान आणले होते. शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी करून नुकसान केल्यामुळे या कर्नल केदार गायकवाड याच्याविरोधात खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार मोनिका गणेश गाडे (रा. खालुब्रे ता खेड ) यांचे नांदावे सुनील नामदेव भरणे (रा माण ता. मुळशी ) यांनी गुळाणी येथील जमीन गट नंबर २४४ असलेली जमिन सन२०१८ खरेदी करून कागदपत्रे सातबारा वरती नावे झाल्याने या या सदर या जमिनीचे मालक भरणे व गाडे आहेत. ( दि २२ ) रोजी गुळाणी येथे कर्नल केदार विजय गायकवाड हे ४ लष्कराच्या गाड्यांमधून 30 ते ४० जवानांना घेऊन शस्त्रासह गावात आले होते. गायकवाड हे त्या जवानांना घेऊन गावामध्ये रायफल्स बेकायदा जमाव जमून फिरून दहशत निर्माण होईल असे कृत्य करत होते. त्यानंतर त्यांनी सदर जवानासह गाडे व भरणे यांच्या मालकीच्या शेतात ट्रॅक्टर लावून मशागत करण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्याबरोबर असलेले लष्कराचे जवान हे शस्त्रधारी असल्याने भीतीपोटी फिर्यादीने कुठल्याही प्रकारचा विरोध अथवा प्रतिबंध केला नाही. 

शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान केले. कर्नल केदार गायकवाड यांनी जमिनीमध्ये येऊ नये म्हणून गाडे व भरणे कुटुंबीयांना व गावातील लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी म्हणून याकरता शस्त्रांसह लष्करी जवान आणून दहशत निर्माण केलेली आहे .याबाबत खेड पोलीस ठाण्यात मोनिका गणेश गाडे यांनी कर्नल केदार गायकवाड यांच्याविरुद्ध फिर्याद गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. 

याबाबात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुळाणी येथील परिमल विजय गायकवाड यांच्या कुटुंबातील काही व्यक्तीनी वारस हक्कांनी मिळालेली जमीन दिलीप नामदेव भरणे ( रा. मुळशी ) यांना सन २०१८ विकली होती. मात्र, गायकवाड कुटुंबियांनी ही जमीन आमची आहे म्हणून या जमिनीचा वाद दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. सध्या दावा दिवाणी न्यायालयात सुरू आहे. या घटनेबाबत तक्रार दाखल न झाल्याने खेड पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता सीआरपी कलम १४९न्वे राखण्यासाठी तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार यांच्याकडे पत्र व्यवहार केला होता.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवान