देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर गुन्हा दाखल करा ; पुण्यातील वकिलाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 16:59 IST2019-11-28T16:49:34+5:302019-11-28T16:59:59+5:30

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जी मंत्रीपदाची शपथ घेतली हाेती ती लाेकशाहीला काळीमा फासणारी घटना असल्याचे म्हणत पुण्यातील एका वकीलाने दाेघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

file case against devendra fadanvis and ajit pawar demand of pune's lawyer | देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर गुन्हा दाखल करा ; पुण्यातील वकिलाची मागणी

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर गुन्हा दाखल करा ; पुण्यातील वकिलाची मागणी

राजगुरुनगर : देवेंद्र फडणवीसअजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतली होती ती लोकशाहीला काळीमा फासणारी व घटना बाह्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून ठोस कारवाई केली जावी अशी मागणी अ‍ॅड. पुष्कराज परदेशी यांनी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. 

भारतीय जनता पक्षाची साथ शिवसेनेने सोडल्याने स्वबळावर व काही अपक्ष आमदारांच्या सहकार्याने भाजपाला सरकार स्थापन करणे अशक्य होते. देवेंद्र फडणवीसअजित पवार यांनी संगनमताने गैरप्रकार केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांच्या सह्या असलेली कागदपत्रे  विधिमंडळ पक्ष नेते या नात्याने ताब्यात घेऊन राज्यपालांना सर्व आमदारांचा पाठिंबा असल्याचे भासवून फसवणूक केली. शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हि अजित पवार यांची वैयक्तीक कृती असुन पक्षाचा कोणताही संबंध नाही असे जाहीर केले. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी संख्याबळ होत नसल्याने राजीनामा दिला. तरी फडणवीस व पवार यांच्या या कृत्याने घटनेची मुलभूत तत्वे पायदळी तुडवली असल्याने याची सर्वांगीण चौकशी होऊन ठोस कारवाई केली जावी अशी मागणी अ‍ॅड.परदेशी यांनी केली आहे.

Web Title: file case against devendra fadanvis and ajit pawar demand of pune's lawyer