शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

Pune | सिंहगड एक्सप्रेसमध्ये जागेसाठी भांडण, व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 19:11 IST

पास धारकांना दोन बोगी देण्याची मागणी...

पिंपरी : लॉकडाऊनपूर्वी सिंहगड एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या १९ होती. लॉकडाऊननंतर ती १६ करण्यात आली. डब्यांची संख्या कमी झाल्याने तब्बल ३००-३२५ सीट्स कमी झाल्या आहेत. त्यामुळे बसायला जाग मिळत नसल्याने सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांमध्ये भांडणे होत आहे. असा एक भांडणाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

यामधील पुरुष प्रवासी महिलेशी असभ्य भाषेत भांडणात दिसून येत आहे. रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी सांगितले की, सिंहगडने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तसेच पासधारकांची संख्या अधिक आहे. मात्र, पुर्वीपेक्षा एक्सप्रेसच्या डब्बांची संख्या कमी केल्याने प्रवाशांना बसायला देखील जागा मिळत नाही. या विषयी आम्ही वारंवार निवेदन रेल्वे प्रशासनाला दिले. रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: पाहणी करून वस्तुस्थिती पाहिली. तरी देखील डब्ब्यांची संख्या वाढली नाही.

१५ दिवसांत चार भांडणेसिंहगड एक्सप्रेसमध्ये फक्त जागेच्या कारणावरून मागील १५ दिवसांत चार भांडणे झाली जी आरपीएफपर्यंत पोहचली. आरपीएफने देखील कारवाई करत संबधितांना समज दिली. मात्र, अशी प्रकरणे जागेच्या अभावी घडतच राहणार, असे एका महिला प्रवाशानी सांगितले.

पास धारकांना दोन बोगी देण्याची मागणीपासधारकांसाठी लॉकडाऊन आधी दोन बोगी दिल्या जात होत्या. मात्र, त्या आता दिल्या जात नाही. त्यामुळे पुर्वी प्रमाणे पासधारकांना दोन बोगी देण्यात याव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाकडून केली जात आहे.

जागेअभावी प्रवाशांमध्ये भांडण होत आहेत. त्यामुळे रेल्वेप्रशासनाने पुर्वीप्रमाणे डब्ब्यांची संख्या वाढवावी. पासधारकांसाठीच्या बोगी पुर्वीप्रमाणे सुरु करावी, अशी आमची मागणी आहे.- इक्बाल मुलाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी