पुणे जिल्ह्यात ‘असा’असेल पाचवा लॉकडाऊन; जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन आदेश जारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 11:38 AM2020-06-01T11:38:00+5:302020-06-01T11:48:23+5:30

महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन- पाच संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी घोषणा केली.

The fifth lockdown in Pune district will be 'this' type ; Late night order issued by the Collector | पुणे जिल्ह्यात ‘असा’असेल पाचवा लॉकडाऊन; जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन आदेश जारी 

पुणे जिल्ह्यात ‘असा’असेल पाचवा लॉकडाऊन; जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन आदेश जारी 

Next
ठळक मुद्देजिल्हा अंतर्गत बस सेवा, शाळा महाविद्यालये, क्लास बंदच राहणारसार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी कायम असून, धार्मिक स्थळे अद्यापही लॉकडाऊनमध्ये राहणार

पुणे : केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील पाचव्या लॉकडाऊन संदर्भात स्वतंत्र आदेश जाहिर केले. यामध्ये जिल्हा अंतर्गत बस सेवा, शाळा महाविद्यालये, क्लास बंदच राहणार आहेत. याशिवाय सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी कायम असून, धार्मिक स्थळे अद्यापही लॉकडाऊनमध्ये राहणार आहेत.
केंद्र शासनाने लॉकडाऊन पाच संदर्भात दोन दिवसांपूर्वीच आदेश काढले व प्रत्येक राज्यांनी आपल्या राज्यातील परिस्थिती पाहून स्वतंत्र आदेश काढण्यास सांगितले.त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन पाच संदर्भात मुख्यमंत्री यांनी रविवार घोषणा केली. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आल्या नंतर जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र आदेश जाहिर केले. 
----- 
जिल्ह्यात अद्याप या गोष्टींना परवानगी नाही 
- जिल्हा अंतर्गत सार्वजनिक वाहतूक, बस सेवा बंद 
- शाळा, महाविद्यालये, क्लास, वसतीगृहे बंदच राहणार 
- सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी कायम 
- जिल्ह्यातील धार्मिक स्थळे लॉकडाऊनमध्येच राहणार 
- सलुन, ब्युटी पार्लर, स्पा सेंटरला देखील पुन्हा बंद 
----- 
काय सुरू होणार 
- खेळाची मैदाने वैयक्तिक सरावासाठी 
- कृषी विषयक सर्व कामे
- दुकाने सुरू होतील

Web Title: The fifth lockdown in Pune district will be 'this' type ; Late night order issued by the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.