पंधरा दिवसांतच संपले १ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 03:41 AM2019-03-12T03:41:45+5:302019-03-12T03:42:15+5:30

जुलै महिन्यापर्यंत धरणांत साठाच राहणार नाही

Fifteen days end in 1 TMC water | पंधरा दिवसांतच संपले १ टीएमसी पाणी

पंधरा दिवसांतच संपले १ टीएमसी पाणी

googlenewsNext

पुणे : पुणे महानगरपालिका व परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरण प्रकल्पात केवळ ११ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.केवळ १५ दिवसांमध्ये धरण प्रकल्पातील १ टीएमसी पाणीसाठा संपला आहे.मात्र,याच पध्दतीने पाणीसाठा संपत गेला तर जुलै महिन्यापर्यंत धरणात पाणीच उरणार नाही? अशी भिती व्यक्त केली जात आहे.

खडकवासला धरणप्रकल्पात २३ फेब्रुवारी रोजी १२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.त्यानंतर अवघ्या १५ दिवसात म्हणजेच ११ मार्च रोजी धरणात केवळ १०.९७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे केवळ १५ दिवसांमध्ये धरणातील १ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे.पुणे महापालिका व जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी वापरावरीला वाद शामला आहे. मात्र,तीन व्यक्तीनी पालिकेच्या अधिकच्या पाणी वापरावर उच्च न्यायालयात याचिका दखल केली आहे.त्यामुळे पालिकेचा पाणी प्रश्न पुन्हा चव्हाटयावर आला आहे. त्यात पंधरा दिवसात १ टीएमसी पाणी साठा संपल्याने पुणेकारांवर पाणी कपातीचे संकट ओढविन्याची शकता आहे.

उन्हाचा तडाखा वाढला असून पुढील काही महिन्यात तापमानात चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पिभवन मोठ्या प्रमाणावर होणार आहे.परिणामी धरणाच्या तापळीत आणखीच घट होणार असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मागील वर्षी ११ मार्च रोजी खडकवासला धरण प्रकल्पात १५.३१ टीएमसी पाणी साठा उपलब्ध होता. मात्र,यंदा ११ मार्च रोजी केवळ १०.९७ टीएमसी पानीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धारण प्रकल्पात गेल्या वषार्पेक्षा ४.३७ टीएमसी एवढे पाणी कमी आहे.

Web Title: Fifteen days end in 1 TMC water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.