शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकानेच केला विद्यार्थीनींचा लैंगिक छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 19:25 IST

वर्गशिक्षक विद्यार्थीनींसाेबत अश्लिल चाळे करत असल्याचा प्रकार समाेर आला आहे.

पुणे : हडपसर, येथील एका शाळेतील वर्गशिक्षकानेच अश्लील व्हिडीओ दाखवून डान्स शिकविण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनींच्या खासगी भागांना हात लावून घरी येऊन तसे करण्याची धमकी दिली. हा प्रकार विद्यार्थिनीने घरी येऊन आईला सांगिल्यानंतर समोर आला. याप्रकरणी तेरा वर्षीय पिडीतेच्या आईने  फिर्याद दाखल केली असून वर्गशिक्षकावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, रामेश्वर राठोड (रा. खराडी चंदननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. फिर्यादी या धुणीभांडीचे काम करतात. तर त्यांचे पती ड्रायवर आहेत. त्यांना तीन आपत्ये आहेत. त्यांची मोठी मुलगी तेरा वर्षांची आहे. ती हडपसर येथील माळवाडी परिसरात असलेल्या एका शाळेत सहावीच्या वर्गात शिकते. दरम्यान गुरुवारी मुलगी घरी आल्यनंतर तिने वर्गशिक्षक राठाेड हे डान्स शिकविण्याच्या बहाण्याने मला व मैत्रिणींना खाजगी जागेत हात लावतात. तसेच वर्गात अश्लिल व्हिडीओ दाखवतात. ही बाब काेणाला सांगितल्यास तसा प्रकार घरी येऊन करेन अशी धमकी दिल्याचे मुलीने आईला सांगितले. 

विद्यार्थिनी एखादा प्रश्न विचारण्यास गेल्यावर विद्यार्थीनीच्या खासगी भागांवरून राठाेड हात फिरवत. गेल्या एक महिन्यांपासून राठाेड वर्गातील मुलींसोबत हा प्रकार करत हाेता. फिर्यादी महिलेने याची खात्री करण्यासाठी शाळेत धाव घेतली. पिडीत मुलीच्या वर्गमैत्रिणीलाही याबाबत विचारणा केल्यावर दोन आठवड्यापुर्वी राठोडने असाच प्रकार तिच्यासोबत केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर महिलेने पतीला बोलावून हा प्रकार सांगितला. तसेच शाळेतील टिच फॉर इंडीया फेलो मधील दोन महिलांना याबाबत सांगितल्यावर त्यांनी एका एनजीओच्या दोन महिलांना कळविले. त्यांनी मुलींकडे येऊन चौकशी केल्यावर त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. रामेश्वर राठोड हा वर्गातील सर्वच मुलींसोबत हा  प्रकार करत असल्याची माहिती पुढे आली आहे .पुढील तपास उपनिरीक्षक एस एस गावडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणTeacherशिक्षकStudentविद्यार्थी