शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महिला पत्रकाराचा विनयभंग; वादकाला प्रकरण भोवले, ढोल-ताशा पथकातील दोघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 19:07 IST

पायावरून चाक गेल्याने महिला पत्रकाराने त्याच्याकडे विचारणा केली, तेव्हा वादकाने महिला पत्रकाराशी वाद घालून धक्काबुक्की करून अश्लील वर्तन केले

पुणे : विसर्जन सोहळ्यात वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी अश्लील वर्तन करून तिच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्रिताल ढोल-ताशा पथकातील दोन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बेलबाग चौकात ही घटना घडली. याबाबत एका महिला पत्रकाराने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वादकांवर भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ (१), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला पत्रकार विसर्जन सोहळ्यात शनिवारी (दि. ६) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास वार्तांकन करत होती. त्या वेळी त्रिताल ढोलताशा पथकातील एका वादकाने लोखंडी ट्राॅली ओढत आणली. पायावरून चाक गेल्याने महिला पत्रकाराने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा वादकाने महिला पत्रकाराशी वाद घालून धक्काबुक्की केली. तिच्याबरोबर अश्लील वर्तन केले. महिला पत्रकाराबरोबर असलेल्या सहकाऱ्याने वादकाला जाब विचारला. तेव्हा वादक आणि त्याच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्याने त्याला धक्काबुक्की केली. मारहाणीत त्यांचा चष्मा तुटला. ढोल पथकातील वादकांनी दोघांनी शिवीगाळ केली. त्यानंतर महिला पत्रकाराने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या प्रकरणी ढोल-ताशा पथकातील दोन वादकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाMolestationविनयभंगPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सवSocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी