शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

आत्महत्या करावीशी वाटतेय; थांबा, इथे फक्त एक फोन करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 17:39 IST

विनामूल्य समुपदेशन: कोरोनाने खचलेल्या मनाला मिळतेय उभारी

पुणे: कोरोनामुळे आलेली बेरोजगारी, व्यवसायात अपयश यातून खचलेल्या मनांना ऊभारी द्यायचे काम कनेक्टिंग ट्रस्ट च्या माध्यामातून होते आहे. विनामूल्य हेल्पलाईनद्वारे समुपदेशन करून अशा व्यक्तींवर उपचार होतात.

आत्महत्या रोखण्याच्या उद्देशाने अर्णवाझ दमानिया यांनी पुण्यात सन २००५ मध्ये 'कनेक्टिंग ट्रस्ट' ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या संस्थेतील समुपदेशक दूरध्वनी संवादाच्या माध्यमातून तणावग्रस्तांचे मन हलके करतात. पुणे पोलीस, ससून जनरल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने 'सुसाईड सर्वायव्हर सपोर्ट प्रोग्राम' राबविला जात आहे.

लॉकडाऊन कालावधीत व्यथा मांडणाऱ्या ईमेलची संख्या १५ ते ४५, तर कॉलची संख्या १६० च्या पुढे असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. आत्महत्येचा विचार करणाऱ्यांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक झाले असल्याचेही संस्थेतील समुपदेशकांचे निरीक्षण आहे.पुण्यातून सुरु झालेले हे काम दिल्ली, हरियाणा, औरंगाबाद, नागपूर, हिंगणघाट, पनवेल या ठिकाणीही सुरू आहे. 'कनेक्टिंग ट्रस्ट'चे सीईओ लियान सातारावाला याचे नियोजन करतात.

९९२२००४३०५, ९९२२००११२२ हे हेल्पलाईनचे क्रमांक असून रोज सकाळी १२ ते रात्री ८ या वेळेत कधीही फोन करा, फोन करणाऱ्याचे नाव, सर्व माहिती गुप्त ठेवली जाते,असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड