पतीच्या विवाहबाह्य संबधाला कंटाळून विवाहितेनं मुलीसह विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 07:01 PM2021-09-22T19:01:46+5:302021-09-22T19:01:57+5:30

दोन व्यक्तींविरुध्द भिगवण पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fed up with her husband's extramarital affair, the married woman jumped into a well with her daughter and ended her life. | पतीच्या विवाहबाह्य संबधाला कंटाळून विवाहितेनं मुलीसह विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

पतीच्या विवाहबाह्य संबधाला कंटाळून विवाहितेनं मुलीसह विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

googlenewsNext
ठळक मुद्देपत्नीचा वारंवार शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला

भिगवण : वंशाला दिवा असणारा मुलगा होत नसल्याने होणारा शारीरिक व मानसिक छळ, पतीचे नात्यातील विवाहबाह्य संबंध अशा त्रासाला कंटाळून विवाहितेनं मुलीसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक इंदापूर तालुक्यातील अकोले येथे घडली आहे. या प्रकरणी दोन व्यक्तींविरुध्द भिगवण पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनिषा महादेव दराडे(वय.२७) व या महिलेने तिची लहान मुलगी भाग्यश्री महादेव दराडे (वय.०३ रा. अकोले,ता.इंदापुर) अशी मायलेकींची नावं आहेत.  याप्रकरणी विवाहितेचा पिता नवनाथ विठोबा खैरे(वय. ६५ रा.दादेगांव, ता.आष्टी, जि. बीड) यांनी भिगवण पोलिस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या फिर्यादीनुसार महादेव चंद्रकांत दराडे व रुपाली शरद खैरे(रा. दोघे अकोले,ता.इंदापुर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मनिषा तुला मुलगा होत नाही त्यामुळे तुला सोडचिठ्ठी देणार' असे म्हणत पतीकडून तिला मारहाण होत असे. तसेच तिचा  वारंवार शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. पतीच्या विवाहबाह्य अनैतिक संबधाला कंटाळून मनिषाने मुलगी भाग्यश्री हिच्यासह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील करत आहेत.

Web Title: Fed up with her husband's extramarital affair, the married woman jumped into a well with her daughter and ended her life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.