शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

माळेगावात गटातटाचे राजकारण डोके वर काढण्याची भीती; वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 11:37 IST

नगरसेवक होण्यासाठी युवा कार्यकर्ते साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करण्याची शक्यता...

माळेगाव (पुणे) : माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होताच गावातील गटातटाचे राजकारण डोके वर काढण्याची भीती व्यक्त होत आहे. नगरसेवक होण्यासाठी युवा कार्यकर्ते साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करण्याची शक्यता यंदाच्या राजकारणात नाकारता येणार नाही. राजकारणात आडवा येणाऱ्याची कशी जिरवाजिरवी करायची याचे पद्धतशीरपणे नियोजन होण्याचे आडाखे आखले जात आहेत.

शाळा-कॉलेजांत शिकणाऱ्या लहान मुलांकरवी घातक हत्यारांचा सर्रासपणे वापर करण्यास या मुलांना प्रवृत्त केले जात असल्याची शक्यता वाढीस लागली आहे. आत्मघाती हल्ले करण्यास फूस लावली जाते. मुलांच्या भविष्याशी खेळले जात आहे. या मुलांना विविध प्रकारचे आमिष दाखवले जाते. महागडे मोबाईल घेऊन देतो, हौसमौज करण्यासाठी पैसे देतो, या ना त्या कारणांनी या मुलांकडून समोरच्याचा काटा काढायचा; आपले राजकीय वलय प्रस्थापित करायचे, असे उद्योग माळेगावमध्ये सर्रासपणे आढळून येत आहेत.

रविवारी माळेगाव कारखाना येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोरील मोकळ्या जागेमध्ये महेश उत्तम पैठणकर यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यांना तत्काळ बारामती येथील खासगी दवाखान्यांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही. गावातील दहा ते पंधरा वर्षांपासून गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या सर्वांचेच रेकॉर्ड तपासले जाणार आहे.

- अनिल अवचर,

पोलीस निरीक्षक, माळेगाव पोलीस ठाणे

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBaramatiबारामतीNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२Electionनिवडणूक