Pune Crime: ‘एफडीए’चे पुण्यात दोन ठिकाणी छापे, ३५ लाखांचा गुटखा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 02:14 PM2024-01-25T14:14:31+5:302024-01-25T14:16:53+5:30

याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

FDA raids two places in Pune, gutkha worth 35 lakhs seized | Pune Crime: ‘एफडीए’चे पुण्यात दोन ठिकाणी छापे, ३५ लाखांचा गुटखा जप्त

Pune Crime: ‘एफडीए’चे पुण्यात दोन ठिकाणी छापे, ३५ लाखांचा गुटखा जप्त

पुणे : जिल्ह्यात दोन ठिकाणी छापे टाकून ३५ लाख १६ हजार ९२१ रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी, आदींचा साठा अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) वतीने जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देहू रोड परिसरातील दांगट पाटील यांचे गोदाम, विकासनगर किवळे या ठिकाणी प्रतिबंधित पदार्थाची साठवणूक व विक्री करण्यात येत असल्याच्या माहितीवरून मंगळवारी (दि. २३) टाकलेल्या छाप्यानुसार २३ लाख ६८ हजार ५८० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच रियाझ अजीज शेख, घर क्र. १२५, देहू मुख्य बाजार, देहू कॅन्टोन्मेंट, देहू बाजार येथे आज टाकलेल्या छाप्यात ११ लाख ४८ हजार ३४१ रुपये किमतीचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणात देहूरोड पोलिस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) एन. आर. सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी शीतल घाटोळ, सायली टाव्हरे, अस्मिता गायकवाड, राहुल खंडागळे, बालाजी शिंदे आणि प्रकाश कचवे यांनी केली. प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, आदींच्या विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ यांनी केले आहे.

Web Title: FDA raids two places in Pune, gutkha worth 35 lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.