एफसी रोड ड्रग्ज प्रकरण: अनधिकृत बांधकामप्रकरणी एल ३ पबच्या मालकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 17:33 IST2024-06-26T17:32:36+5:302024-06-26T17:33:08+5:30
एल ३ या पबमध्ये दोन तरुण ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या पबवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली....

एफसी रोड ड्रग्ज प्रकरण: अनधिकृत बांधकामप्रकरणी एल ३ पबच्या मालकांवर गुन्हा दाखल
पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील एल ३ या पबवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पुणे महापालिकेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी संतोष कामटे आणि रवी महेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एल ३ या पबमध्ये दोन तरुण ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या पबवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.
या कारवाईनंतर एल ३ पबमधील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केली. पुणे महापालिकेने या हॉटेलला नोटिसा देऊनही बेकायदेशीर बांधकाम केले आहे. त्यामुळे महापालिकेने या बांधकामावर कारवाई केली. महापालिका अधिनियमानुसार संबंधित हॉटेलमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार दिली आहे, त्यानुसार हॉटेलमालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.