शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चूक कारचालकाची; शिक्षा दुचाकीस्वाराला, १६ दिवस होते कोमात; अज्ञात चालक फरारच

By नम्रता फडणीस | Updated: October 25, 2023 16:47 IST

गंभीर अपघात होऊनही आरोपी फरार, पोलिसांना अजूनही शोध लागलेला नाही

पुणे : घरी रात्री जेवण करून ते नेहमीप्रमाणे आपल्या दुस-या फ्लॅटवर जायला निघाले. दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगाने येणा-या कारचालकाने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याऐवजी कारचालकाने तिथून पळ काढला. 

अपघात स्थळी उपस्थित असलेला एक व्यक्ती देवदूतासारखा धावून आला आणि त्याने वेळीच रात्री रस्त्यावर पडलेल्या या दुचाकीस्वाराला खासगी रुग्णालयात दाखल केले. कुटुंबाला त्यांच्या अपघाताची बातमी मिळाल्याने सर्वजण सुन्न झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तब्बल पंधरा दिवस ते कोमात होते. दस-याच्या दिवशी ते शुद्धीवर आल्याने कुटुंबाच्या जीवात जीव आला. एका कारचालकाच्या चुकीची दुचाकीस्वाराला मोठी शिक्षा भोगावी लागली. इतका गंभीर अपघात होऊनही पंधरा दिवस उलटले तरी आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांना आरोपीचा शोध लागलेला नाही.      अतुल गणेश धोंगडे ( वय ५९ रा. गंगानगरी प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अजय गणेश धोंगडे या त्यांच्या लहान भावाने फिर्याद दिली आहे. ही घटना कर्वेनगर येथील गिरिजा शंकर सोसायटी समोर रविवारी (दि.८) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. अलंकार पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      माझा भाऊ रात्री जेवण करून आमच्या पश्चिमानगरी कर्वेनगर येथील दुस-या फ्लॅटवर चालला होता. त्यावेळी  कर्वेनगर येथील गिरिजा शंकर सोसायटी समोर रविवारी (दि.८) रात्री साडेबाराच्या सुमारास एका अज्ञात चारचाकी चालकाने धडक दिल्यामुळे भाऊ गंभीर जखमी झाला. त्याला एका व्यक्तीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माझ्या पुतण्याने फोन करून ही माहिती मला दिली. भावावर मेंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या डाव्या बरगडी आणि दोन्ही पायाला मुका मार लागला आहे असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले  आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चारचाकी दिसत असली तरी अंधारात कारचा क्रमांक स्पष्टपणे दिसत नाही. तपास सुरूच आहे - राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक, अलंकार पोलीस ठाणे

माझा भाऊ अपघात झाल्यापासून कोमातच होता. २४ तारखेला तो शुद्धीवर आला आहे. पंधरा दिवस उलटले तरी अजूनही त्या अज्ञात चालकाचा शोध लागलेला नाही- अजय गणेश धोंगडे

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीbikeबाईकcarकार