पाय दाबण्याच्या निमित्ताने अल्पवयीन मुलीवर पित्याचा बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:38 IST2018-04-10T19:38:40+5:302018-04-10T19:38:40+5:30
आदिवासी भागातील भिवाडे खुर्द येथे १७ वर्षीय मुलगी घरामध्ये एकटीच असताना पाय दाबुन देण्याचे निमित्त करुन स्वत:च्या मुलीवरच बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला जुन्नर पोलिसांनी अटक केली आहे.

पाय दाबण्याच्या निमित्ताने अल्पवयीन मुलीवर पित्याचा बलात्कार
जुन्नर: आदिवासी भागातील भिवाडे खुर्द येथे १७ वर्षीय मुलगी घरामध्ये एकटीच असताना पाय दाबुन देण्याचे निमित्त करुन स्वत:च्या मुलीवरच बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला जुन्नर पोलिसांनी अटक केली आहे..
मुलगी व वडील यांच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या निंदनीय घटनेमुळे आदिवासी भागात खळबळ उडाली आहे. आरोपी बापावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडिलांनी पीडित मुलीला आपले पाय दाबण्यास सांगितले होते. यावेळी पाय दाबत असताना नराधम बापाने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. सदर घटना कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या आईला मारून टाकण्याची धमकी आरोपीने दिली होती. पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहे.