अभ्यास न केल्याच्या कारणावरून बापाने अवघ्या ७ वर्षीय मुलीचा मोडला हात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 03:55 PM2021-05-28T15:55:26+5:302021-05-28T15:55:39+5:30

बापावर मारहाणीचा गुन्हा दाखल, उपचारासाठी मुलगी होती रुग्णालयात

The father broke the arm of a 7-year-old girl for not studying | अभ्यास न केल्याच्या कारणावरून बापाने अवघ्या ७ वर्षीय मुलीचा मोडला हात

अभ्यास न केल्याच्या कारणावरून बापाने अवघ्या ७ वर्षीय मुलीचा मोडला हात

Next
ठळक मुद्देबापाने मुलीचा लैंगिक छळ केला आहे का? याचा तपास चालू असल्याचे वकिलांनी सांगितले

पुणे: केवळ अभ्यास न केल्याच्या कारणावरून बापाने आपल्या सात वर्षाच्या मुलीला लाटणे आणि हाताने मारहाण केली. त्यामुळे मुलीचा हात मोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बापाला अटक करण्यात आली.

नागेश महादेव जाधव (वय ३६, रा. भाजी मार्केट, ताडीवाला रस्ता) असे अटक केलेल्या पित्याचे नाव आहे. तो एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. याबाबत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मिनाज विशाल भोले (वय २४, रा. ताडीवाला रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

संबंधित मुलगी ही तिच्या आई-वडिलांसह ताडीवाला रस्त्यावर असलेल्या भीमसेवा तरुण मंडळासमोर रहायला आहे. मुलगी अभ्यास करत नाही म्हणून नागेश याने तिला मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास लाटणे आणि हाताने मारहाण केली. त्यानंतर तिच्या आईला शिवीगाळ केली. मारहाणीत मुलीचा हात मोडला आहे. त्यामुळे उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याने यापूर्वी देखील मुलीला अभ्यासावरून मारहाण केली होती, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

नागेश याने मुलीचा लैंगिक छळ केला आहे का? याचा तपास करायचा आहे. तसेच गुन्ह्याच्या इतर तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला उद्यापर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक ए. के. गोरड या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Web Title: The father broke the arm of a 7-year-old girl for not studying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.