शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कार-बसचा भीषण अपघात, ४ महिलांचा मृत्यू, नगर-कल्याण महामार्गावर दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 12:18 IST

दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी २ महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

ओतूर : नगर कल्याण महामार्गावरील पिंपळगावजोगे फाट्याजवळ (ता.जुन्नर) येथे रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास कल्याणच्या दिशेने येणारी कार व नगरच्या दिशेने येणारी बस यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन महिला जागीच ठार झाल्या, तर पुणे येथे उपचारांदरम्यान २ महिलांचा मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे. टेम्पो ट्रॅव्हलमधील ४ ते ५ जण किरकोळ जखमी झाल्याचे ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी ही माहिती दिली.

अपघाताची माहिती समजताच, स्थानिक ग्रामस्थ व ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर रुग्णांना आळेफाटा येथील हॉस्पिटलमध्ये हलवले. अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. याच गाडीतील भाग्यश्री गायकर (वय १८, रा.कळंब, ता.अकोले. जि.अहमदनगर) व कुसुम मारुती शिंगोटे (वय ५५, रा.बदगी बेलापूर, ता.अकोले जि.अहमदनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. उपचारांदरम्यान सविता साहेबराव गायकर (वय ३८, रा.कळंब ता.अकोले. जि.अहमदनगर) व सुनीता कारभारी हाडवळे (वय ५७ वर्षे, रा.लिंगदेव ता.अकोले जि.अहमदनगर) यांचा मृत्यू झाला. साहील गायकर (वय २२, चालक), साहेबराव गायकर (वय ४२) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टेम्पो ट्रॅव्हलमधील ४ ते ५ लोक किरकोळ जखमी झाले आहेत.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गkalyanकल्याणAccidentअपघातWomenमहिलाDeathमृत्यू