सासवड-जेजुरी रोडवर भीषण अपघात; वाहनाच्या धडकेत एक ठार, चार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 19:21 IST2023-02-08T19:20:50+5:302023-02-08T19:21:17+5:30
सरकार हाॅटेलसमोर मोटारसायकल व अज्ञात वाहनाचा अपघात...

सासवड-जेजुरी रोडवर भीषण अपघात; वाहनाच्या धडकेत एक ठार, चार जखमी
जेजुरी (पुणे) : सासवड- जेजुरी रोडवर मौजे साकुर्डे गावच्या हद्दीत भोंगळे, मळा येथील सरकार हाॅटेलसमोर मोटारसायकल व अज्ञात वाहनाचा अपघात झाला असून या अपघातात चार जण गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू झाला.
अपघाताची फिर्याद अण्णा माणिक निकम (३२), यांनी जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. दि. ७ फेब्रुवारी रोजी सायकांळी शनी जाधव हे मोटारसायकल (एम.एच.३ डी.एफ.५९८७) वरून इंदापूरवरून पुणे येथे जात होते. दरम्यान जेजुरी- सासवड रोडवर मौजे साकुर्डे गावच्या हद्दीत भोंगळे मळा येथील सरकार हाॅटेलसमोर त्याच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने ठोस दिली.
या अपघातात शोभा शनी जाधव (२१) हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. तसेच शनी जाधव (२९), धनराज शनी जाधव (७), अक्का शनी जाधव (६) व सुशांत रावसाहेब घोडके (३) यांना गंभीर व किरकोळ दुखापत झाली. मोटारसायकलचे नुकसान झाले. खाडे तपास करीत आहेत.