दुष्काळात फुलवली ड्रॅगन फ्रूटची शेती , वडापुरी येथील शेतकऱ्याचे यश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 11:56 PM2019-02-07T23:56:29+5:302019-02-07T23:56:42+5:30

नैसर्गिक संकटाला न जुमानता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून त्यावर मात करण्यात इंदापुर तालुक्यातील वडापुरी गावचे शेतकरी हरिप्रसाद थोरात (खुळे) यांनी यश मिळविले आहे.

Farmer's success in the famine of dragon fruit, Dada, Vadapuri | दुष्काळात फुलवली ड्रॅगन फ्रूटची शेती , वडापुरी येथील शेतकऱ्याचे यश

दुष्काळात फुलवली ड्रॅगन फ्रूटची शेती , वडापुरी येथील शेतकऱ्याचे यश

- भिमराव आरडे

काटी : नैसर्गिक संकटाला न जुमानता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून त्यावर मात करण्यात इंदापुर तालुक्यातील वडापुरी गावचे शेतकरी हरिप्रसाद थोरात (खुळे) यांनी यश मिळविले आहे. शेतीला पाणी नाही म्हणून शेती पडीक न ठेवता कमी पाण्यात येणारे ड्रॅगन फ्रुटची शेतीची महाराष्ट्रातील काही भागात सध्या मोठी चलती आहे. अमेरिका, थायलंड देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाणारे हे पीक आता इंदापूर तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातही मूळ धरू लागले आहे. हा पहिलाच प्रयोग थोरात यांनी यशस्वी करून दाखविला आहे.
इंदापूर तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असली तरी दुष्काळाच्या झळा सोसणारे गावे पारंपारिक शेतीबरोबर ऊस, द्राक्षबागेच्या पलीकडे विचार न करणाºया येथील शेतकºयांमध्ये आता वडापुरी येथील हरिप्रसाद थोरात (खुळे) हे चर्चेचा विषय ठरले आहेत.
दुष्काळी स्थितीत कोरडवाहू जमिनीत, कमी पाण्यावर, औषध फवारणीचीही गरज न पडणारी ही शेती निश्चितच या भागातील शेतकºयांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. एकदा लागवड केल्यानंतर पुन्हा मशागत, औषध फवारणी सारख्या खिशाला कात्री लावणाºया खर्चापासून शेतकºयांची सुटका होते, हे या शेतीचे आणखी एक वैशिष्ट्ये. तर विविध औषधी गुण असल्याने बाजारपेठेत या फळांना देखील मागणी असते.
हरिप्रसाद थोरात (खुळे)त्यांचे मिञ राजेंद्र जाधव रा.पिलिव ता माळशिरस. त्याच्या शेतात शिवारफेरी मारत असताना त्याच्या शेतात ड्रॅगन फ्रूटच्या शेती पाहण्यास मिळाली. त्यांनी त्या शेतीची तसेच बाजारपेठ याविषयी सखोल माहिती घेऊन त्यांनी त्यांचा मुलगा कन्हैया थोरात याला ही संकल्पना सांगितली. ही संकल्पना प्रत्यक्षात आण्यासाठी त्यांनी तत्काळ तयारी सुरू केली आणि ड्रॅगन फु्रट शेतीत बहरले.

तीन हजार रोपांची केली होती लागवड

२०१७ च्या अखेरीस जाधव याच्याकडुन ३ हजार रोपे आणून ६० गुंठे जमिनीवर त्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. त्यासाठी ५ बाय १४ फूट अंतरावर सिमेंटचे खांब उभे करून त्याभोवती प्रत्येकी चार अशा एकूण ३००० रोपांची लागवड केली. एकरी साधारणत: पाचशे खांब आणि त्यावर सिमेटच्या प्लेटा लावण्यात आले. त्यासाठी सुमारे अडीच लाख रुपए खर्च आला. आत्तापर्यंत दोनवेळा बहर आल्याचे ते सांगतात.
साधारणत: ५०० किलो फळे या वर्षी लागली आहेत रोपांची वाढ पुर्ण झाल्यानंतर एकरी सहा ते सात लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी त्याची अपेक्षा आहे. पुणे येथील गुलटेकडी मार्केट मध्ये ही फळे विक्रीसाठी पाठविली आहे. लवकरच मुबई, बेंगलोर येथील बाजारपेठेसह मॉलमध्येही ती पाठविण्याचा त्यांचा मानस आहे.

ड्रॅगन फ्रुटची शेती शासकीय अनुदान पासुन वंचित आहे त्याला शासनाचे अनुदान मिळावे. अनुदान मिळाल्यास हे पीक घेण्याकडे कल वाढेल व दुष्काळावर मात करता येईल.
- हरिप्रसाद थोरात (खुळे)

Web Title: Farmer's success in the famine of dragon fruit, Dada, Vadapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे