शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात वन्यजीवांकरिता पाण्याच्या टाक्या उभारण्यात शेतक-यांचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 16:49 IST

वन्यजीवांचा हक्काचा अधिवास माणसाने हिसकावून घेतल्यानंतर त्यांंना अन्नपाण्याकरिता मानवी वस्तीत यावे लागले.

ठळक मुद्देरानमळयातील अभिनव उपक्र, सर्वस्तरातून कौतुक मागील काही वर्षांपासून वन्यप्राणी व माणूस यांच्यातील संघर्ष तीव्र 

पुणे : वन्यजीवांचा हक्काचा अधिवास माणसाने हिसकावून घेतल्यानंतर त्यांंना अन्नपाण्याकरिता मानवी वस्तीत यावे लागले. याचा परिणाम म्हणजे बिबट्यासारख्या हिंसक प्राण्यांनी मानवावर हल्ले करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षात शेकडोहून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वन्यप्राण्यांनी पाण्याच्या शोधाच्या निमित्ताने का होईना मानवी वस्तीत येऊन उपद्रव करु नये, याकरिता आता खेड तालुक्यातील रानमळा गावातील शेतक-यांनी त्यांच्यासाठी डोंगरावरच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. तीन शेतक-यांनी पुढाकार घेवून बांधलेल्या या टाक्याच्या उपक्रमांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. खेड तालुक्यातील रानमळा डोंगराळ भाग. याबरोबरच ब-यापैकी बागायती क्षेत्र, यामुळे वन्यप्राण्यांचा वावर तिथे दिसून येतो. ब-याचदा रात्री उशिरा पाणी पिण्याच्या निमित्ताने बिबट्या जवळपासच्या मानवी वस्तीत आल्याचे गावकरी सांगतात. भविष्यात हा धोका टाळुन कुठलीही जीवीतहानी होऊ नये यासाठी आता डोंगरावर तीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. यावर पाणी पिण्याक रिता मोर, लांडगे, कोल्हे आणि बिबटे येतात. मात्र खासकरुन बिबट्यापासून संरक्षणाकरिता याप्रकारचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. बिबट्याने पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत येऊन त्रास देऊ नये हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. मागील दोन वर्षात दहापेक्षा अधिक जनावरांबर बिबट्याचा हल्ला झाला आहे. तसेच परिसरातील माणसांवर हल्ला करुन त्यांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले आहे.  पाण्याच्या टाक्याच्या बांधण्यात बबन खडके, गेणूभाऊ भुजबळ व राजाराम शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच आपल्या खासगी विहीरीतून पाणीपुरवठा देखील केला आहे. तीन टाक्यांपैकी एक टाकी वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून बिबट्यापासून संरक्षण होण्याकरिता पाण्याच्या टाकीचा पर्याय गावक-यांनी निवडला होता. सध्याच्या दोन टाक्यांमध्ये दर दोन दिवसांनंतर विहीरीतून पाईपलाईनव्दारा पाणी सोडले जाते.  

*  मागील काही वर्षांपासून वन्यप्राणी व माणूस यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे दिसत आहे. टाक्यांच्या माध्यमातून त्या हिंस्त्र प्राण्यांपासून बचाव कसा करायचा याक रिता टाक्यांची कल्पना पुढे आली. सध्या या पाण्याच्या टाक्या केवळ मोर, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे यांच्याबरोबरच बिबट्याकरिता मोठा आधार आहे. दोन नव्याने बांधण्यात आलेल्या टाक्या या पाच बाय पाच आकारातील आहेत. वनाधिकारी शुभांगी चव्हाण यांनी देखील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीforestजंगलFarmerशेतकरी