शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकेच्या दारात शेतकऱ्याचा दशक्रिया विधी

By admin | Updated: June 4, 2016 00:35 IST

नामदेव झगडे या शेतकऱ्याने कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे आत्महत्या केली, असा आरोप झगडे कुटुंबीयांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

बारामती : काझड (ता. इंदापूर) येथील नामदेव झगडे या शेतकऱ्याने कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे आत्महत्या केली, असा आरोप झगडे कुटुंबीयांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दोन्ही शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. ३) सकाळी १० वाजता युको बँकेच्या दारातच झगडे यांचा दशक्रिया विधी केला. मात्र, मृत शेतकरी आमच्या बँकेचे थकबाकीदार नव्हते, अशी माहिती बॅँक व्यवस्थापनाने दिली आहे. शेतकरी झगडे यांचा दि. २६ मे रोजी मृत्यू झाला. त्यांनी बँकेच्या तगाद्यामुळे आत्महत्या केली, असा झगडे कुटुंबीयांसह शेतकरी संघटनांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या दारातच दशक्रिया विधी करून आंदोलन करण्यात आले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण म्हणाले, की आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. शिंदेवाडी गाव ५० टक्के पैसेवारीच्या खाली आहे. त्यानंतरदेखील बँकेने वसुलीचा तगादा लावला. रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते म्हणाले, की बँकांनी कर्जाच्या वसुलीसाठी केलेले दावे त्वरित मागे घ्यावेत. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्यास अंत्यविधी बँकेच्या दारात करण्यात येतील. या वेळी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष अमर कदम यांचे भाषण झाले. या वेळी झगडे कुटुंबांसह नीलेश देवकर, विठ्ठलराव देवकाते, ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव दिलीप निंबाळकर, शहाजी झगडे, नितीन भोईटे, नामदेव झगडे आदी उपस्थित होते. वारसाला बँकेत नोकरीस घ्यावे...मृत शेतकरी नामदेव झगडे यांच्या कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर बँकेत कामावर घ्यावे. त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी बँक व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे शेतकरी संघटनांनी केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास झगडे यांचा १३ वा विधीसह इतर विधी प्रतीकात्मक आंदोलन म्हणून करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. अध्यादेशाबाबत अधिकारी अनभिज्ञ..५० टक्के पैसेवारी असणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली करता येत नाही. याबाबत शासनाचा अध्यादेश आहे. हा अध्यादेश बँक अधिकाऱ्यांना या वेळी दाखविला. मात्र, त्याबाबत माहिती नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे बँक अधिकारी शासनाच्या अध्यादेशाला महत्त्व देत नसल्याचा आरोप रायते यांनी केला.मृत शेतकरी बॅँकेचे थकबाकीदार नव्हते : व्यवस्थापकयुको बँकेच्या प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मृत नामदेव झगडे हे आमचे थकबाकीदार नाहीत. तसेच, त्यांचे छायाचित्रदेखील बँकेत लावले नव्हते. त्यांचे भाऊ बँकेचे थकबाकीदार आहेत. त्यांना सूचना करण्यासाठी आमचे संबंधित कर्मचारी गेले असतील. मात्र, झगडे यांना आम्ही कोणतीही नोटीस पाठविली नाही. तसेच, कोणताही त्रास दिला नाही, असे बँक व्यवस्थापक एकाग्रप्रकाश त्यागी यांनी सांगितले.