शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने नाकारली कर्जमाफी

By admin | Updated: June 16, 2017 04:42 IST

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली आहे. याने तमाम शेतकरीवर्ग आनंदी झाला असतानाच सरकारतर्फे करण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवासुंदे : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली आहे. याने तमाम शेतकरीवर्ग आनंदी झाला असतानाच सरकारतर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन वासुंदे (ता. दौंड) येथील वामनराव शंकर भगत या शेतकऱ्याने ‘आपल्याला कर्जमाफीतून वगळण्यात यावे,’ असे लेखी पत्र विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडे सुपूर्त करून स्वत:हून कर्जमाफी नाकारली आहे. त्यामुळे त्यांनी तालुक्यातीलच नव्हे, तर राज्यातील आणखी एक शेतकरी होण्याचा मान मिळविला आहे.वामनराव भगत यांची वासुंदे (ता. दौंड) येथे वडिलोपार्जित जमीन आहे. ते स्वत: शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सद्य:स्थितीत शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. त्याचबरोबर शासनाने गॅस सबसिडीप्रमाणे जे स्वत:हून कर्ज भरण्यास सक्षम आहेत, त्यांना कर्जमाफी सोडण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देऊन व दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन या शेतकऱ्याने वासुंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व सचिव यांच्या नावे लेखी पत्र लिहून आपण पीककर्ज भरण्यास सक्षम असल्याने शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीतून आपणास वगळण्यात यावे, अशी विनंती केली आहे. वामनराव भगत यांच्याकडे ५०,१८५ रुपयांचे पीककर्ज असून, त्यावरील व्याज ८,३४१ असे एकूण कर्ज रक्कम रुपये ५८,५२६ इतकी आहे. या कर्जाची माफी नाकारण्याचे पत्र त्यांनी वासुंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन उमेश जांबले व सचिव संजय साळवे यांच्याकडे सुपूर्त केले. या वेळी माजी सरपंच राजेंद्र जगताप, उपसरपंच दिलीप जगताप, सोसायटीचे चेअरमन उमेश जांबले, दादासाहेब माकर, शहाजी जांबले, प्रभाकर जांबले, मच्छिंद्र जांबले, दिलीप कुंभार, किसन जांबले, दिगांबर हाजबे, सुरेश लोंढे व ग्रामस्थ उपस्थित होते.शेतमालाला हमीभाव हवाराज्य शासनाने जरी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केली आहे, तरीसुद्धा अगदी खेड्यातील गरिबांतील गरीब शेतकऱ्याला त्याचा लाभ व्हावा, हा उद्देश ठेवून व नुकतीच दौंडचे आमदार राहुल कुल यांनीही कर्जमाफी नाकारली त्यांची प्रेरणा घेऊन आपण हा कर्जमाफी नाकारण्याचा निर्णय घेतला. परंतु, तळागाळातील शेतकरी जर वाचवायचा असेल, तर शासनाने शेतमालाला हमीभाव मिळवून देणे गरजेचे आहे.- वामनराव भगत,कर्जमाफी नाकारणारे शेतकरी