शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

प्रसिद्ध संगीतकार शंकर यांच्या पियानोची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात भर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 6:37 PM

शंकर जयकिशन यांचे संगीत हे भारतीय चित्रपट इतिहासाचा एक मोलाचा ठेवा आहेत. विशेषत: राज कपूर यांच्या चित्रपटांसाठी शंकर जयकिशन यांनी शैलेंद्र, हसरत जयपुरी, मुकेश व लता मंगेशकर यांच्याबरोबर गाण्यांचा एक सुवर्ण इतिहास रचला.

ठळक मुद्देअसंख्य लोकप्रिय गाण्यांनी १९५०, ६० आणि ७० अशी तीन दशके रसिकांच्या मनावर गारूड निर्माण १९६८ मध्ये केंद्र सरकारने शंकर-जयकिशन या दोघांचाही पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव

पुणे : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अजरामर ठरलेल्या  प्रसिद्ध संगीतकार शंकर-जयकिशन या द्वयीने बासरीसह अनेक वाद्यांचा संगीतामध्ये वापर केला, त्यातील अत्यंत महत्वाचे पाश्चात्य वाद्य म्हणजे पियानो. दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा यांसह अनेक गाण्यांमधील पियानोवरचे दर्दभरे सूर आजही मनामध्ये रुंजी घालतात. याच जोडीतील शंकर यांच्या वैयक्तिक पियानोची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया (एनएफएआय)च्या खजिन्यात भर पडली आहे. संगीतकार शंकर यांचे नातू संतोषकुमार यांनी शंकर यांचा पियानो एनएफएआयकडे देणगीस्वरूपात सुपूर्त केला आहे.शंकर जयकिशन यांचे संगीत हे भारतीय चित्रपट इतिहासाचा एक मोलाचा ठेवा आहेत. विशेषत: राज कपूर यांच्या चित्रपटांसाठी शंकर जयकिशन यांनी शैलेंद्र, हसरत जयपुरी, मुकेश व लता मंगेशकर यांच्याबरोबर गाण्यांचा एक सुवर्ण इतिहास रचला. ही गाणी असंख्य चित्रपट रसिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली.शंकर जयकिशन यांच्या अनेक गाण्यांमध्ये पियानोचा सुरेख वापर करण्यात आला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात तयार करण्यात आलेला हा पियानो सुमारे ९० वर्षे जुना आहे.स्कीडमायर कंपनीच्या या अप्राईट पियानो मध्ये साडेसात सप्तकातील ८८ पट्ट्या ( चाव्या) आहेत.  रिदम,  मेलडी,  ऑर्केस्ट्रेशन यांचा सुमधुर मिलाप करण्यात या संगीतकार द्वयीचा हातखंडा होता. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या असंख्य लोकप्रिय गाण्यांनी १९५०, ६० आणि ७० अशी तीन दशके रसिकांच्या मनावर गारूड निर्माण केले. १९६८ मध्ये केंद्र सरकारने शंकर-जयकिशन या दोघांचाही पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.  शंकर यांचा पियानो एनएफएआयमध्ये जतन करण्यास मिळणे याला विशेष महत्व आहे.ज्यांच्या सूरांमुळे असंख्य गाणी श्रवणीय आणि अजरामर झाली. तो संस्मरणीय पियानो एनएफएआयच्या खजिन्यात समाविष्ट झाल्याबददल एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी संतोषकुमार आणि संदीप आपटे यांच्याबददल कृतज्ञता व्यक्त केली. -------------------------

टॅग्स :PuneपुणेmusicसंगीतPrakash Magdumप्रकाश मगदूम