निलेश राऊत - पुणे : घर-अंगण स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडणारी कुटुंबे आपण नित्याने पाहतो. मात्र घरातील व घराच्या अंगणातील कचरा घराबाहेरच जाऊ न देता तो घरातच जिरवायचा आणि वापरायचा, हे ब्रीद घेतलेली माणसे दुर्मिळात दुर्मीळ आहेत. असेच एक कुटुंब पिंपळे निलखमध्ये वास्तव्यास आहे. या कुटुंबाने गेल्या पंधरा वर्षात प्लॅस्टिक वगळता कचऱ्याचा एकही कण घराबाहेर जाऊ दिलेला नाही नाही. डॉ़साधना व डॉ़ पांडुरंग पाटील ही ती ‘झीरो वेस्ट फॅमिली.’ त्यांचे घर म्हणजे एक जंगलच असून अंगणाच्या कुंपणाला नारळाच्या झाडांच्या झावळ्या, झाडांच्या तुटलेल्या फांद्यांचे आच्छादन आहे. घराच्या दरवाज्यातच गप्पी माशांसाठी बांधलेली खुली टाकी, गच्चीत विविध झाडे हे त्यांचे वैभव आहे.
पंधरा वर्षात प्लास्टिक वगळता कचऱ्याचा कण घराबाहेर न टाकणारे कुटूंब
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 06:00 IST
विशेष म्हणजे घरात त्यांनी आजपर्यंत टिव्हीही घेतलेला नाही...
पंधरा वर्षात प्लास्टिक वगळता कचऱ्याचा कण घराबाहेर न टाकणारे कुटूंब
ठळक मुद्दे‘झीरो वेस्ट फॅमिली’ ने टेरेसवर फुलविला कंपोस्ट खतातून मळा वाळलेल्या झाडांच्या फांद्या तसेच नारळाच्या झावळ्यांचा वापर घरातील ‘बॉयलर’साठी झाडांच्या फांद्या, नारळाच्या करवंट्या, वाळलेला पालापाचोळा आदीचे अंगणातच कंपोस्ट खत