शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

दिवसरात्र आपल्यासाठी बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांसाठी 'काय पण'; पुण्यातील जैन कुटुंब 'अशी' घेतेय पोलिसांची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 12:51 IST

स्वत:चा जीव धोक्यात घालून नको ते उद्योग कशाला करतोस असा प्रश्न अनेकांनी त्यांनी केला.

ठळक मुद्देजैन कुटुंबातील सदस्यांकडून 'आयुर्वेदिक काढ्याचे' वाटप : दुपारी तीन आणि पहाटे दोन वाजता देतात सेवा 

युगंधर ताजणे-  पुणे : जर पोलिसांत असतो तर मलाही बंदोबस्ताचे काम करावेच लागले असते. तेव्हा कुणीही घरी बसून दिले नसते. सध्याच्या परिस्थितीत जीवावर उदार होऊन प्रसंगी आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता सहभागी झालेल्या पोलिसांना सहकार्य करणे त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. ते आपल्यासाठी सगळे करत असतील तर आपली काही जबाबदारी आहे की नाही ? असा प्रश्न टिम्बर मार्केट येथे राहणाऱ्या अभय जैन यांना पडला. यातून त्यांना पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी 'आयुर्वेदिक काढा' तयार करण्याची प्रेरणा मिळाली.

भवानी पेठेत गिफ्ट आर्टिकलचे दुकान चालवणाऱ्या अभय जैन यांना पोलिसांना आयुर्वेदिक काढा तयार करण्याची कल्पना सुचली. त्यांनी ती तातडीने अंमलात देखील आणली.२३ मार्च पासून त्यांनी काढा वाटपास सुरुवात केली. कदाचित लॉकडाऊन वाढल्यास काढ्याचे वितरण सुरू ठेवणार असल्याचे ते सांगतात. या कामात त्यांना त्यांचे वडील चूनीलाल जैन, आई शांती जैन आणि पत्नी अमिता जैन यांचे सहकार्य लाभले. स्वत:चा जीव धोक्यात घालून नको ते उद्योग कशाला करतोस असा प्रश्न अनेकांनी जैन यांना केला. मात्र ते यावर सगळ्यांना आपल्या सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या पोलिसांकरिता काही करायला हवे ही इच्छा स्वस्थ बसू देईना. त्यातून त्यांनी काढा वाटपास सुरुवात केली. पूर्ण शहरातील पोलीस ठाणे, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना त्यांनी काढा देण्यास सुरुवात केली. टिळक रस्ता, फरासखाना, खडक पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालय, बंडगार्डन तसेच वानवडी, हडपसर याठिकाणी बंदोबस्तात असणा?्या पोलिसांना काढ्याचे कप दिले जात आहे. सुरुवातीला त्यांना यात अडचणी आल्या. कुणी हा काढा घ्यायला तयार होईना. अनेकांनी काढा घेण्यास नकार दिला. मात्र जैन यांनी हार न मानता त्याचे वाटप सुरू ठेवले. आता काढा यायला थोडा उशीर झाला तर पोलीस त्यांना स्वत:हून फोन करून काढा घेऊन या. असा निरोप पाठवतात. 

* पहिल्यांदा काढा तयार केल्यानंतर तो एका आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवला. त्यांनी तो चांगला असल्याचे सांगितले. मग तो वितरित करण्याचा निर्णय घेतला. काढा वाटपासाठी एकटा घरातून बाहेर पडतो. त्यासाठी योग्य ती काळजी घेतो. मास्क घालणे, सॅनिटाईजर जवळ बाळगणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे यासर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. आपल्या थोड्याशा मदतीने जर पोलिसांना ऊर्जा आणि त्यांचे मनोबल वाढणार असेल तर ते काम आनंदाने करायला हवे. ही या मागील भूमिका आहे. - अभय जैन (काढा वाटप करणारे) 

* काढ्यात आहे तरी काय ? आले, काळेमिरी, काळे मीठ, लवंग, दालचिनी, वेलची, लिंबू, आंबे हळद, पुदिनाची पाने, तुळशीचे पाने, ओवा, हिंग ही सर्व सामग्री मिळून आयुर्वेदिक काढा तयार केला जातो. या सर्व सामग्रीला एका मोठ्या भांड्यात अर्धा ते पाऊण तास उकळले जाते. जे साहित्य यात वापरले आहे त्याचा अर्क पाण्यात पूर्णपणे उतरण्यासाठी ते सतत ढवळले जाते. त्यानंतर ते एका मोठ्या थर्मास मध्ये गाळून भरले जाते. काढ्यासाठी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी वापरले जाते. 

* वाटप कसे होते ? एका वेळी साधारण 60 ते 65 लिटर काढा तयार होतो. यात एकूण 1200 कपचे काढा वितरण करता येते. एका ट्रिप मधून 12 लिटर काढा वाटपासाठी नेता येतो. पोलीस कर्मचा?्यांना दररोज 150 मिली काढयाची गरज आहे. एक कपमधून त्यांना 60 मिली काढा मिळतो. दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत काढा वितरित करण्यात येतो. तसेच रात्री अकरा ते पहाटे दोन या वेळेत देखील पोलिसांना काढा देत असल्याचे जैन यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस