शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त कुटुंबियांना अखेर मिळाला न्याय : दोन प्रकरणात ५० लाखांवर भरपाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 19:32 IST

मोशी व खडी मशीन चौकात अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना लोक अदालती मध्ये न्याय मिळाला.

पुणे : अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन प्रकरणांमध्ये लोकअदालतमध्ये अखेर न्याय मिळाला. अपघाताच्या दोन्ही प्रकरणांतून त्यांना नुकसानभरपाई दिली आहे. यात एका प्रकरणात २५ लाख, तर, दुसऱ्या प्रकरणात २५ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. पहिले प्रकरण अनिता शंकर पोतदार (वय ३३, रा. चाकण) यांनी अ‍ॅड. कांचन धामणकर यांच्याव्दारे ९ आॅक्टोबर २०१७ रोजी मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. अनिता यांचे पती शंकर गणेशराव पोतदार (वय ४३) हे १९ सप्टेंबर २०१७ रोजी नाशिक-पुणे रस्त्याने चाकणकडून भोसरीकडे दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी मोशी चौकात डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते एका कंपनीत कामाला होते. त्यांना दरमहा १७ हजार रुपये पगार होता. पत्नी, दोन मुले आणि आईचे पालकत्व त्यांच्याकडे होते. या पार्श्वभूमीवर आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीच्या विरोधात दाखल केलेल्या दाव्यात ३० लाख रुपये नुकसानभरपाई मागितली होती. मात्र, २५ लाख रुपये नुकसानभरपाई देत तडजोडीअंती दावा निकाली काढला. विमा कंपनीच्या वतीने अ‍ॅड. हृषीकेश गानू यांनी काम पाहिले. दुसरा दावा सुमित चंद्रकांत शिंदे (वय २६, येवलेवाडी) यांच्या मृत्यूप्रकरणी वडील चंद्रकांत आणि आई शैलजा यांनी अ?ॅड. कांचन धामणकर यांच्यामार्फत दाखल केला होता. १८ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी खडीमशिन चौकात रस्त्याच्या कडेला सुमित उभे राहिले असताना त्यांना डंपरने धडक दिली. २३ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांचा उपचाराद रम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ते सक्सेस इन्स्टिट्युट चालवत होते. तसेच नियमित आयकर भरत असत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बजाज अलायन्स कंपनीच्या विरोधात दाखल केलेल्या दाव्यात ३० लाख मागितले होते. लोकअदालतमध्ये २५ लाख ५० हजार रुपये देत हा दावा निकाली काढला.  

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयAccidentअपघातFamilyपरिवार