शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बिहारमधून मोठा शस्त्रसाठा येणार असल्याचे सांगणारा निघाला तोतया अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 3:46 PM

पोलिसांनी आणखी खोलात जात चौकशी केल्यावर तो एका खुनाच्या गुन्ह्यात बिहारमधून फरार असल्याचे समोर आले़. काही वेळाने त्याचे बिंग फुटले आणि आपण खरी ओळख सांगत, आपण फसविण्यासाठी रॉ चा अतिरिक्त पोलीस अधीक्षक असल्याचे सांगितले़. 

ठळक मुद्देखुनाच्या गुन्ह्यात होता फरारी

पुणे : मी रॉ चा अधिकारी असून बिहारमधून मोठा शस्त्रसाठा येणार आहे, अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्यात आलेल्याने त्याने दिली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच खळबळ उडाली. त्याच्याकडे अधिक चौकशी करीत असताना पोलिसांना संशय  आला़ पण, इतका मोठा अधिकारी असेल तर त्याची चौकशी कशी करायचा असा प्रश्न पोलिसांना पडला़, तेव्हा त्यांनी त्याचे आयकार्ड मागितले़ आयकार्ड ठेवत नसल्याचे सांगितल्यावर हा संशय अधिकच वाढला़. त्याचवेळी पोलिसांनी आणखी खोलात जात चौकशी केल्यावर तो एका खुनाच्या गुन्ह्यात बिहारमधून फरार असल्याचे समोर आले़. काही वेळाने त्याचे बिंग फुटले आणि आपण खरी ओळख सांगत, आपण फसविण्यासाठी रॉ चा अतिरिक्त पोलीस अधीक्षक असल्याचे सांगितले़. सोनु सुरज तिवारी (वय २६, रा़ लक्ष्मीनगर, कोंढवा, मुळ कासमा, ता़ रफिरंज, जि़ औरंगाबाद, बिहार) असे त्याचे नाव आहे़. हे नाट्य कोंढवा पोलीसठाण्यात शनिवारी दुपारी २ वाजता रंगले होते़.  याप्रकरणी पोलीस नाईक अमोल फडतरे यांनी फिर्याद दिली आहे़.  याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोनु तिवारी हा मुळचा बिहारचा राहणार आहे़.  त्याने वादविवादातत तेथे आका नावाच्या व्यक्तीचा खुन केला. तो एक महिन्यांपूर्वी पळून पुण्यात आला़. त्याच्या दोन साथीदारांना बिहार पोलिसांनी अटक केली असून याचा ते शोध घेत आहेत़.  चार पाच दिवसांपासून तो कोंढव्यात रहायला आला़.  शनिवारी दुपारी तो कोंढवा पोलीस ठाण्यात आला व तेथील अधिकाऱ्यांना आपण रॉ मध्ये अ‍ॅडिशनल एस पी आहे़.  बिहारमधून मोठा शस्त्रसाठा कोंढवा परिसरात येणार आहे़ हे ऑपरेशन आपल्याला करायचे असून, तुम्ही आम्हाला मदत करा असे सांगितले. ही माहिती ऐकून अधिकारी अवाक झाले. त्यांनी तातडीने त्याची माहिती वरिष्ठांना दिली़ . त्याच्याकडून त्याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न सुरु केल्यावर त्याच्या बोलण्यात विसंगतीदिसून येऊ लागली़ . तेव्हा त्याच्याकडे ओळखपत्र विचारले़.  त्याने आपण ओळखपत्र ठेवत नसल्याचे सांगून पोलिसांनी काही नंबर सांगितले़.  त्यावरुन पोलिसांचा संशय आणखीनच वाढला़. 

त्यांनी पुण्यातील गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांना ही माहिती देऊन पुण्यात त्यांचा कोणी अधिकारी आला आहे का याची चौकशी केली़. तेव्हा त्यांनी असा कोणताही अधिकारी आला नसल्याचे सांगितले़.  त्यानंतर गुप्तचर अधिकारी कोंढवा पोलीस ठाण्यात आले़. त्यांनीही त्याचा चौकशी केली़.  त्याने सांगितलेले नंबर कोणत्याही अधिकाऱ्यांचे नसल्याचे स्पष्ट झाले़. तेव्हा त्याची झडती घेण्यात आली़ त्यात त्याच्याकडे पोलीस व लष्करी गणवेशातील काही फोटो आढळून आले़.   त्याचवेळी दुसरे अधिकारी बिहार पोलिसांशी संपर्क साधत होते़.  त्याची माहिती विचारल्यावर त्यांनी हा तर खुनाच्या गुन्ह्यातील फरारी असल्याचे सांगितले़.  तेव्हा आणखी एकदा पोलिसांवर अवाक होण्याची पाळी आली़.  पोलिसांनी त्याला अटक केली आहे़. बिहारचे पोलीस पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी पुण्याकडे रवाना झाले आहे. पोलीस इतके खोलात चौकशी करेल याची कल्पना आली नाही़सानु तिवारी याला त्याने हा बनाव का केला असे विचारल्यावर त्याने यापूर्वीही अशा प्रकारे काही ठिकाणी फसविले होते. पोलिसांना माहिती दिल्याचे दाखवून आपली ओळख निर्माण करुन इतरांना टोपी घालण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण, कोंढवा पोलिसांनी त्याची बारकाईने चौकशी केल्यानेत्याचे बिंग फुटले़ आपली इतकी चौकशी पोलीस करतील असे वाटले नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkondhvaकोंढवाPoliceपोलिस