‘नोटाबंदी’नंतरही बनावट नोटांचा बाजार गरम; ११७ गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 05:33 AM2019-04-14T05:33:27+5:302019-04-14T05:33:33+5:30

नोटाबंदीनंतरही कोट्यवधी रुपये मूल्याच्या बनावट नोटांचा बाजारातील ओघ थांबलेला नाही.

The fake banknotes are also hot after 'nonsense'; 117 cases filed | ‘नोटाबंदी’नंतरही बनावट नोटांचा बाजार गरम; ११७ गुन्हे दाखल

‘नोटाबंदी’नंतरही बनावट नोटांचा बाजार गरम; ११७ गुन्हे दाखल

googlenewsNext

पुणे : नोटाबंदीनंतरही कोट्यवधी रुपये मूल्याच्या बनावट नोटांचा बाजारातील ओघ थांबलेला नाही. गेल्या वर्षी १ कोटी ११ लाख ५२ हजार ५७० रुपये मूल्याच्या तर २०१७ मध्ये १ कोटी १६ लाख ९७ हजार ५० रुपये मूल्याच्या बनावट नोटा तपास यंत्रणांनी हस्तगत केल्या.
विशेष म्हणजे चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या ३ हजार ९१ नोटा २०१८ मध्ये पकडल्या. नव्याने सुरु झालेल्या दोन हजार रुपयांच्या ४ हजार ६१५ नोटा २०१७ मध्ये ताब्यात घेतल्या आहेत.
देशभरात ८ नोव्हेंबर २०१६ नोटाबंदी लागू झाल्यानंतर थोड्याच कालावधीत वेगवेगळ्या राज्यांमध्ये बनावट नोटा हस्तगत करण्याचे सत्र सुरू झाले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पुणे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये पाचशे रुपयांच्या ४ हजार ६९१ बनावट नोटा पकडल्या असून त्यात सर्वाधिक बनावट नोटा नागपुरात सापडल्या आहेत. त्याची आकडेवारी २ हजार ६६१ आहे. पाठोपाठ औरंगाबाद (१0७१), नाशिक (५५३) ही शहरे आहेत. नव्याने आलेल्या दोनशे रुपयांच्या २ हजार ९ बनावट नोटा यवतमाळ मधून हस्तगत झाल्या. गेल्या चार वर्षात पुण्यात बनावट नोटाबंदीच्या गुन्ह्यात २० गुन्हे दाखल केल. त्यात १८ जणांना अटक झाली आहे. यापैकी ११ गुन्हे उघड झाले.
>बनावट नोटा आपल्यापर्यंत इतक्या सहज पोहचत नाहीत. विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींच्या साखळीद्वारे त्या नोटा येतात. पूर्वी पाकिस्तानामधून बनावट नोटा येत. आता त्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. याचे कारण म्हणजे भारताने नोटांचा कागद आणि शाई यात केलेला फरक. नोटाबंदीनंतर बँकेतून टेÑझरीमध्ये पाठवणाऱ्या खोट्या नोट्या बाजुला काढल्या जाऊ लागल्या. टेÑझरीतून रिझर्व बँकेकडे नोटा जाताना त्या पुन्हा एकदा तपासल्या जातात. त्यावेळी देखील बनावट नोटा सापडल्यास चौकशी होते. परराज्यातून विशेषत: सीमेवरील राज्यातून बनावट नोटा येण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. प्रशासन दोषींवर कारवाई करते. मात्र दरवेळी प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा बनावट नोटाबंदीच्या बाबत लोकसहभाग जास्त महत्वाचा वाटतो. - जयंत उमराणीकर, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक

Web Title: The fake banknotes are also hot after 'nonsense'; 117 cases filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.