पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये एक किळसवाणा प्रकार शनिवारी बावीस मार्चला घडला. स्वच्छतागृहात लघुशंका करणाऱ्यांचा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. या प्रकरणी अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मंगेश जव्हाहिरे याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी बावीस मार्च संध्याकाळी सात वाजता घडली.
पुण्यातील कोथरूड परिसरातील असलेल्या एका लॉन्समध्ये एक नृत्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एकजण स्वच्छतागृहात व्हिडिओ काढत असल्याचं समजल्यानंतर एकच गोंधळ उडाला. यावेळी पळून जात असलेल्या आरोपीला तेथील कामगारांनी पकडलं. आणि चांगलाच चोप दिला. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचा मोबाइल तपासला. तर त्याने महिलांचे नव्हे तर पुरुषांच्या स्वच्छतागृहात लघुशंका करणाऱ्यांचा व्हिडिओ काढला असल्याचं दिसून आलं. याबाबत एका कामगाराने पोलिसास फिर्याद दिली आहे. डीपी रोडवरील एका लॉन्सच्या सार्वजनिक स्वछतागृहात लघुशंका करणाऱ्यांचा व्हिडिओ काढणाऱ्याला तेथील कामगारांनी बेदम मारहाण करुन पोलिसांच्या हवाली केलं. महिलांच्या स्वछतागृहातील व्हिडिओ त्याने काढल्याचं समज सुरुवातीला झाला होता. मात्र त्याचा फोन तपासल्यानंतर त्याने पुरुषांच्या स्वछतागृहात लघुशंका करणाऱ्यांचा व्हिडिओ काढला असल्याचं दिसून आलं.
नेमकं काय घडलं?
मंगेश नंदकुमार जवाहरी असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत लॉन्समधील एका कामगाराने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना डीपी रोडवरील एका लाँजमध्ये शनिवारी सायंकाळी सात वाजता घडली. लॉन्समध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी शेकडो लोक एकत्र आले होते. त्यावेळी एकजण स्वच्छतागृहात व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याचं काही जणांनी सांगितल्याने एकच गोंधळ उडाला. सुरुवातीला त्याने महिलांचे व्हिडिओ काढल्याचा लोकांचा समज झाला होता. गोंधळ झाल्यावर तो पळून जाऊ लागला. तेव्हा तेथील कामगारांनी त्याला पकडलं. त्यानंतर त्याला चांगलाच चोप दिला. आणि पोलिसांना बोलावून हवाली केलं. पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईलचे तपासणी केली. तेव्हा त्यात महिलांचे नाही तर पुरुष लघुशंका करतानाचा व्हिडिओ काढल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी त्या कामगाराची फिर्याद घेऊन रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.