माजी मंत्री विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी; एकनाथ शिंदेची केली होती पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 10:26 IST2022-07-16T10:25:53+5:302022-07-16T10:26:47+5:30

शिंदे गटात गेल्याने पक्षाकडून कारवाई....

Expulsion of former minister Vijay Shivtare from Shiv Sena; Eknath Shinde was supported | माजी मंत्री विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी; एकनाथ शिंदेची केली होती पाठराखण

माजी मंत्री विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी; एकनाथ शिंदेची केली होती पाठराखण

पुणे: पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधात आणि पक्षाची शिस्त मोडल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सामना या वृत्तपत्रातून म्हटले आहे.

मागील काही दिवसांपासून सतत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्ट्या करण्याचे सत्र शिवसेनेत सुरू आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी कडक भूमिका घेतल्याचं यावरून दिसून येत आहे.

एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून फुटल्यानंतर शिवतारेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेत शिवसेना नेतृत्वावर टीका केली होती. तसेच एकनाथ शिंदेंची त्यांनी त्यावेळी पाठराखणही केली होती. शिंदे पुण्यात आले असताना त्यांच्या स्वागतासाठी शिवतारे हजर होते. 

Web Title: Expulsion of former minister Vijay Shivtare from Shiv Sena; Eknath Shinde was supported